Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal
Updated on

Farmer leaders reject the Government's proposal: शेतकरी नेत्यांनी सरकारचा एमएसपीचा फॉर्म्युला नाकारला

सरकारने दिलेला नवा एमएसपीचा फॉर्म्युला शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. त्यामुळे आम्ही तो फेटाळत आहोत, असं शेतकरी नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे दिल्ली चलो आंदोलन सुरुच राहणार आहे.

 UP: समाजवादी पार्टीकडून यूपीमध्ये काँग्रेसला १७ जागांचा प्रस्ताव

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यूपीमध्ये काँग्रेसला १७ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे काँग्रेस तो स्वीकारणार का हे पाहावं लागेल.

Farmer Protest: शेतकरी आंदोलन होणार आणखी तीव्र; हरियाणात भाजपच्या कार्यालयांना घेरणार

एमएसपीच्या मुद्द्यावरुन शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. हरियाणातील भाजप कार्यालयांसमोर २१ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले जाणार आहे.

भाजप यावेळी संसदेतून हद्दपार होणार; मल्लिकार्जुन खरगे

भाजप ४०० पार होऊ म्हणत आहे, पण यावेळी ते संसदेतूनच हद्दपार होतील अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

Afghanistan landslide : अफगाणिस्तानमध्ये दरड कोसळल्याने २५ लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये नुरुस्तान प्रांतात दरड कोसळल्याने २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

आधार कार्ड बंद झालेल्यांना ममता बॅनर्जींचा दिलासा; सुरु केली नवी सुविधा

आदिवासी असल्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आले नाही

अयोध्येत नुकत्याच झालेल्या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आदिवासी असल्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले नाही. असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Congress News: महाराष्ट्र पोलिसांमध्ये नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक नाही का?

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक नाही का? असा संतप्त सवाल करून राणेंवर कारवाई करण्याची हिम्मत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

भारत आणि EU मध्ये होणार महत्वाची बैठक

ऑनलाइन डिसइन्फॉर्मेशन, आणि सोशल मिडीयावर चिकिची माहिती बाबत भारत आणि EU मध्ये होणार महत्वाची गोलमेज बैठक होणार आहे.

मी लोकसभेसाठी इच्छुक नाही - नारायण राणे

मी लोकसभेसाठी ईच्छुक नसल्याचे मंत्री नारयण राणे यांनी सांगितले आहे.

भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही- जयंत पाटील 

भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतोय. मला भाजपकडून कोणतीही ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

भाजप प्रवेशाच्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र खुद्द जयंत पाटलांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. शिवाय ते पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहे.

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा ?

MSP आणि इतर मागण्यांसाठी दिल्लीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता उद्धव ठाकरेही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शंभू बॉर्डरवर ठाकरे आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊ शकतात, असंही सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

Rajasthan Congress : राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका

राजस्थानमधील काँग्रेस नेते महेंद्रजीत मालवीय यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तीन IIM चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या (मंगळवार) तीन नव्या IIM चे उद्घाटन होणार आहे. जम्मू, बोधगया आणि विशाखापट्टणम येथे हे नवे IIM सुरू होणार आहेत. यासोबतच ते देशभरात केंद्रीय विद्यालयाच्या 20 नव्या इमारती आणि 13 नव्या नवोदय विद्यालयांचे उद्घाटन देखील करणार आहेत.

मराठा समाजाच्या हाती काहीही लागणार नाही- राज ठाकरे

राज्य सरकारकडून मराठा समाजाला फक्त झुलवलं जातंय. मराठा समाजाच्या हाती काहीही लागणार नाही. कारण आरक्षणाचा निर्णय हा फक्त केंद्रातूनच होऊ शकतो, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.

Jayant Patil:जयंत पाटील थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपमध्ये जाणाऱ असल्याच्या चर्चा होत आहे. मात्र, जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेतील.

Ashish Shelar: आदित्य ठाकरेंना आशिष शेलारांचं आव्हान

Ashish Shelar on Aditya Thackrey: भाजप नेते आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचं आव्हान दिलं आहे.

Hemant Godse Accident:खासदार हेमंत गोडसेंच्या कारचा अपघात, गोडसे थोडक्यात बचावले

खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत.

Pulpully Violence: वनविभागाच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

पलपल्ली या ठिकाणी वनविभागाच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला होता. यापैकी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले शारदाश्रम शाळेच्या विद्यार्थींचे पालक

शारदाश्रम शाळेच्या विद्यार्थींचे पालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. या शाळेतील १२ शिक्षकांपैकी १० शिक्षकांना निवडणूकींची ड्युटी लावली आहे. उरलेल्या २ शिक्षकांपैकी १ शिक्षकांचा अपघात झाला आहे. त्यामुळे ऐन परिक्षेच्या कालावधीत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Manoj Jarange: सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये- मनोज जरांगे

Maratha Reservation: माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, "सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. सगेसोयऱ्यांसाठी मराठा आमदारांनी आवाज उठवला पाहिजे."

MNS and BJP Alliance:मनसे आणि भाजपत युती होण्याची शक्यता

मनसे आणि भाजपमध्ये युती होऊ शकते, अशी शक्यता साम टीव्हीकडून वर्तवण्यात आली आहे.

Raj Thackeray : शेलारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद; मोठी घोषणा करणार?

भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे अन् आशिष शेलार यांच्यात तासभर चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune Drugs Case : पुणे पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई! ४ कोटींच्या ड्रग्जसह तिघे अटकेत

ड्रग्ज तस्करांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसोबत तीन तस्करांना अटक केली आहे. यासोबत ड्रग्ज तस्करांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट देखील उघड झाल्याचा माहिती समोर आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti :  मनोज जरांगेंच्या उपस्थितीत अंतरवाली सराटी येथे साजरी झाली शिवजयंती

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरा करण्यात आली. यावेळी नारायणगड संस्थानचे महंत शिवाजी महाराज देखील उपस्थित होते.

Pune Crime News : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. पुण्यात सुरू होते रोहिदास जाधव या तरुणावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी रोहिदास ने ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतलं होतं. दिलेल्या तक्रारीत पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह; ठिकणिकाणी झळकले बॅनर

आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होत आहे. संपूर्ण आग्रा शहरात शिवजयंतीसाठी हजारो बॅनर लावण्यात आले आहेत. मोठा उत्साहया ठिकाणी दिसून येत आहे.

Covid: कोरोनामुळे इतर जगापेक्षा भारतीयांच्या फुफ्फुसांचं झालं सर्वाधिक नुकसान

ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविडमधून बरे झालेल्या भारतीयांपैकी लक्षणीय प्रमाणात फुफ्फुसाचे कार्य कमी झाले आहे आणि लक्षणे महिने टिकून आहेत. युरोपियन आणि चिनी लोकांपेक्षा भारतीयांच्या फुफ्फुसाचे कार्य अधिक बिघडल्याचे आढळून आले आहे. अभ्यासात म्हटले आहे की, काही लोक एका वर्षात हळूहळू सामान्य स्थितीत परत येऊ शकतात, तर इतरांना आयुष्यभर फुफ्फुसाच्या नुकसानासह जगावे लागेल, असे त्यात म्हटले आहे.

Fire News: सोलापूरात शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक

सोलापूरात शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगी गावात शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली आहे. परमेश्वर मणुरे या शेतकऱ्याचा दोन एकर उस जळून खाक झाला आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात अगोदरच दुष्काळजन्य परिस्थिती आणि अशातच मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Pune Traffic: शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; हे रस्ते असणार बंद, या मार्गांचा करा वापर

शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.(Shivjayanti Pune Traffic Changes)

बातमी सविस्तर वाचा- Shivjayanti Pune Traffic Changes: शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर

NCP Political Crisis: शरद पवारांना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज काय होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची शरद पवार यांची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवनेरीवर दाखल

शिवजयंती निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शिवनेरीवर दाखल झाले आङेत

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे, आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. शिवरायांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतही शिवजयंतीचा उत्साह आहे. शरद पवारांना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज काय होणार आज सुनावणी होणार आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com