Shivjayanti Pune Traffic Changes: शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर

Shivjayanti Pune Traffic Changes: राज्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजंयती साजरी केली जाते. यामुळे मोठमोठ्या शहरात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होतात.
Shivjayanti Pune Traffic Changes
Shivjayanti Pune Traffic ChangesEsakal

राज्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजंयती साजरी केली जाते. यामुळे मोठमोठ्या शहरात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक मुख्य रस्ते उद्या वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.(Shivjayanti Pune Traffic Changes)

पुण्यात वाहतुकीमध्ये उद्या(सोमवारी) मोठे बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सोमवारी सकाळी सात ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेलं आहे.

शिवजयंती निमित्ताने पुण्यात मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येतात. यामुळे बाजीराव रस्ता, कुमठेकर रोड, केळकर रोड व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

Shivjayanti Pune Traffic Changes
Pune Traffic News : विद्यापीठ चौकात काहीसा दिलासा ; पोलिसांकडून वाहतुकीत बदल

या पर्यायी मार्गांचा करा वापर

जिजामाता चौक येथून शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज मार्गाने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने जावे.

गणेश रस्ता – दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक – दारुवाला पुल चौकातुन वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल.

केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळवण्यात येणार आहे.

मिरवणुक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड वरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतून वळवण्यात येईल.

पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालक पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने जातील.

मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे जातील.

मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे जातील.

मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहनांना शनिवार वाड्याकडे न जाता येणार नाहीत. या वाहचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे जाता येईल.

Shivjayanti Pune Traffic Changes
Pune University : विद्यापीठ चौकाला दिलासा! पोलिसांकडून वाहतुकीत बदल, विद्यापीठात मिलेनियम गेटमधून प्रवेश

विद्यापीठ चौकात वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आनंदऋषिजी महाराज चौकातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने वाहतूक पोलिसांनी काही नवे बदल केले आहेत. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मिलेनियम गेटचा (चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन) वापर सुचविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील वळण अडथळे लावून बंद करण्यात आले. बाणेर रस्त्यावरील हाय स्ट्रीट ते विद्यापीठापर्यंतच्या भागात मेट्रोने बॅरिकेड्स आत ओढून घेतले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी थोडी जास्त मोकळी जागा मिळण्यास मदत झाली. औंधकडून शिवाजीनगरकडे येणारी जड वाहनांची वाहतूक ब्रेमेन चौकातूनच वळविण्यात आली. त्यामुळेही वाहनचालकांना थोडा फरक जाणवला.

पर्यायी मार्गाचा अभाव

शिवाजीनगरकडून बाणेर, औंध, बालेवाडी, बावधन, पिंपळे गुरव अथवा सांगवी आदी भागात जाण्यासाठी किंवा तिकडून शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे वाहनचालकांसाठी विद्यापीठ चौकातून जाणे हाच एक पर्याय आहे. पूर्वी मोठे पूल असूनही तेथे वाहतूक कोंडी होत होती. आता मेट्रोच्या कामामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

Shivjayanti Pune Traffic Changes
Uber Cab Pune : कॅबचालकांच्या संपात उबरचा सहभाग नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com