दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

'लोक माझे सांगाती'मधून पवारांचा बेळगावविषयी गौप्यस्फोट

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आगामी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमावादाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांचे लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले आहे. या पुस्तकात शरद पवारांनी अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

या पुस्तकातच शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्न सोडवण्यासाठी न्यू बेळगाव चा प्रस्ताव मांडला होता अशी खळबळजनक माहिती दिली आहे.

शरद पवारांची निवृत्ती आम्हाला मान्य नाही - जितेंद्र आव्हाड 

शरद पवारांची निवृत्ती आम्हाला मान्य नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे. शरद पवार यांच्याकडे बघून आम्ही राजकारण शिकलो असं आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार- शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्याला विरोध केला होता.

पुणे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालबाहेर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

 सिल्व्हर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू 

 सिल्व्हर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे

राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार 

शरद पवारांनी राजीनामा परत घ्यावा; पवारांच्या बहीण सरोज पवार यांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी राजीनामा परत घ्यावा अशी प्रतिक्रिया पवारांच्या बहीण सरोज पवार यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न

यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु असून उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा सुप्रिया सुळे प्रयत्न करत आहेत. 

शरद पवारांचा अंतिम निर्णय झाल्यावर बोलू  - देवेंद्र फडणवीस

राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. आता बोलण उचित नाही, शरद पवार यांचा अंतिम निर्णय झाल्यावर बोलू.

रोहित पवार शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत

धाराशीवच्या NCP जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेचे पडसाद

धाराशीवचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राजीनामा दिला आहे. बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी देखील राजीनामा दिला आहे.

शरद पवार यांच्या घराबाहेरील पोलिस बंदोबस्तात वाढ 

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर आणखी काही घटना घडू नये यासाठी शरद पवार यांच्या घराबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार 

उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सर्वानाच याचा धक्का बसला आहे.

शरद पवारांची निवृत्तीची घोषणेला कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा विरोध

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या" अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या आहेत.

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा, कार्यकर्त्यांचा गोंधळ

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

सविस्तर वाचा-

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देखील सोडणार, पवारांनी केला निवडणूक लढवण्याबद्दल मोठा खुलासा

बिहारमधील झोपडपट्टीत लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

बिहारमध्ये रामदयाळू रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टीत काल रात्री 12 वाजता आग लागली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत.

लोक माझे सांगती भाग - २, पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात

शरद पवार यांच्या लोक माझे सांगती पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खुलासे केले आहेत.

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3,325 नवीन रुग्ण आढळले

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3,325 नवीन रुग्ण आढळले असून 6,379 लोक बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 44,175 सक्रिय रुग्ण आहेत.

मोदींना शिविगाळ म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार - फडणवीस

नरेंद्र मोदींना जितक्या शिव्या देणार तितके लोक त्यांना पराभूत करतील. या लोकांनी मोदी यांना जितक्या शिव्या दिल्या तितके लोकांचा पाठिंबा मिळत आहे. मोदी यांना शिविगाळ करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते गडचिरोलीत बोलत होते.

मोहित कंबोज आज पत्रकार परिषद घेणार!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्हिडि ट्वीट केल्याप्रकरणावर मोहीत कंबोज पत्रकार परिषद घेणार आहेत.

राज्यातील 'या' भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात हलका पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र व देशातील सर्व ताज्या अपडेट तुम्हाल इथं वाचायला मिळतील. काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. त्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते प्रतिक्रिया देऊ शकतात. आज राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाच्या अपडेट देखील वाचायला मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com