दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

मोबाईल बॅटरीचा स्फोट, चिमुकली जखमी

रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील आंबिवली गावात एक घटना घडली आहे. मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. या घटनेमध्ये होवून 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. अनिता वाघमारे असे तिचे नाव असून तिच्या तोंडाला दुखापत झाली आहे.

माळशेज घाटात बसला अपघात, १० जखमी

माळशेज घाटात मुंबई-नाशिक महामार्गावर बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत.

पुण्यात गारांसह पावसाला सुरुवात

पुण्यात गारांसह पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील पाषाण भागामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच बाणेर, औंध, विद्यापीठ परिसर आणि कोथरुडमध्ये मोठा पाऊस सुरु झाला आहे.

22 आमदारांच्या प्रकरणावरुन उदय सामंतांचं ट्वीट

"शंभूराज देसाई आणि २२ आमदार नाराज हे पत्रकार परिषद घेऊन सांगणे म्हणजे आपल्या सोबतचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत निघाले आहेत ह्यावर शिक्कामोर्तब करणे आहे...त्यांना थांबण्यासाठी केलेली ही राजकिय खेळी आहे...थोड्या दिवसात कळलेले असेल नक्की सत्य काय आहे.." असं ट्वीट सामंतांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सप्तश्रुंगी मंदिरात चोरी, ग्रीलमधून हात घालून पादुका चोरीला

शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या गणेशवाडी येथील देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. देवीच्या मंदिरात असलेल्या पितळीच्या भरीव पादुका चोरीला गेल्या आहेत.

पुण्यात आयटी पार्कमध्ये भीषण आग

पुण्यातील कल्याणी नगर मधील आयटी पार्कमध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये काही कर्मचारी अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पुण्यात हादरलं! प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

वाघोलीत प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केली आहे. दोघांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

'ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव दिला गेलाय'

माझ्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही राष्ट्रवादीत विलीन करावी असा प्रस्ताव दिला गेलाय, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

पाषाण ते चांदणी चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी

पाषाण ते चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी. चेलाराम हॉस्पिटलजवळ पुलावर अर्ध्या तासापासून लोक अडकले आहेत.

GSLV-F12 उपग्रह प्रक्षेपित केला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात GSLV-F12 उपग्रह प्रक्षेपित केला.

उद्धव ठाकरेंकडे काही मिळणार नाही- रामदास आठवले

रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना खोचक सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

काँग्रेस खासदार बाळू धानोरक यांची प्रकृती जिंताजनक

काँग्रेस खासदार बाळू धानोरक यांची प्रकृती जिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे.

आठवडाभरात मान्सून होणार केरळात आगमन, त्यापूर्वीच राज्यभरात अवकाळीचा इशारा

येत्या आठवडाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com