आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीक वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीक वर

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडीचें अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.

महाविकास आघाडीत बिघाडी? अजित पवारांचं मोठ विधान

अजित पवार म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आघाडीची वाट पाहत बसू नका. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल. मात्र तूम्ही कामाला लागा आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा, आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे गेले असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवारांच मोठ विधान

आघाडीची वाट पाहत बसू नका ती लवकरच होईल, पण तुम्ही कामाला लागा.

आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा.

आपली ताकद दिसली तरच मिञ पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील.

पुण्यातील कात्रज घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा अपघात

भीषण अपघातात १ जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. दुचाकीस्वार एसटीला पाठीमागून धडकला असल्याची प्राथमिक माहिती. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून पुढील तपास सुरू आहे.

चावा घेऊन महिलेचा तोडला कान

Nashik Crime: नाशिक येथील दिंडोरी येथे भर रस्त्यात एका महिलेला पकडून तिच्या कानाला चावा घेत तिचा कान तोडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अजित पवारांचा पक्षातीन नेत्यांना सावधगिरीचा इशारा

आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका”, असं आवाहन अजित पवार यांनी दिलंय.

शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांच्यावर गोळीबार

शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. सूरी हे गोपाल मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन करत होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळी झाडली.

आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर

आदित्य ठाकरे अब्दुल सत्तारांच्या पाठोपाठ सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असून सांगोला तालुक्यात सभा घेणार असल्याची माहिती सेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिली.