Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Marathi News Live Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

Mayawati: सरकार आल्यास पश्चिम यूपीला वेगळे राज्य करणार; मायावतींची मोठी घोषणा

मायावती यांनी निवडणुकीसाठी मोठा डाव खेळला आहे. आमचं सरकार आल्यास पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसची १० उमेदवारांची यादी जाहीर; कन्हैया कुमार दिल्लीतून मैदानात

काँग्रेसने १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात कन्हैया कुमार यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्याविरोधात मैदानात असतील.

Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एकाची ओळख पटली

सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोनपैकी एका आरोपीची ओळख पटली आहे. विशाल उर्फ काळू असं आरोपीचं नाव असल्याचं कळतंय. सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

dhairyashil mohite: कार्यकर्त्यांना विचारुन हा निर्णय घेतलाय- धैर्यशील मोहिते पाटील

धैर्यशील मोहिते यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. कार्यकर्त्यांना विचारुन हा निर्णय घेतलाय, असं मोहिते म्हणाले.

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

मुंबईत बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीला गेल्याचे माहिती मिळत आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अजित सिंह नगर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी सीएम जगन यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आमदार वेल्लमपल्ली श्रीनिवास यांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला. याव्यतिरिक्त, विजयवाडा पोलिसांनी आयपीसी कलम 307 अंतर्गत एफआयआर नोंदवला.

 इअर इंडियाकडून तेल अवीवला जाणारी विमाने तात्पुरती स्थगित

इराण आणि इस्त्राइल यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्त्राइल मधील महत्वाचे शहर तेल अवीवला जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


रोड शो दरम्यान ममता बॅनर्जींचा कलाकारांसोबत डान्स

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान चालसा, जलपाईगुडी येथे त्यांच्या रोड शो दरम्यान कलाकारांसोबत नृत्य केलं. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

दिल्लीत एका खाजगी शाळेच्या आवारात उभ्या बसला आग  

दिल्लीतील द्वारका भागात एका खाजगी शाळेच्या बसला आवारात उभी असताना आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणले की...

मुंबईत अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आवश्यक माहिती मिळाल्यावर कळवण्यात येईल असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

"ही दुर्दैवी घटना आहे"; सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया

सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "ही दुर्दैवी घटना आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. मी सलमान खानशीही बोललो आहे. मी त्यांना सांगितले आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही."

Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर पहाटे काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.. पाहा व्हिडीओ

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज पहाटे गोळीबार झाला. पहाटे 5 वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. मुंबई (Mumbai) पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. अशातच आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दोन बाईकस्वार दिसत आहेत.

Navi Mumbai: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ बेशिस्त रिक्षा चालकांना नवी मुंबईत पोलिसांचा दणका

Navi Mumbai:  बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे.

एकाच दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

जरांगे-पाटलांचा इशारा

"जर येत्या काही महिन्यांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर मी पुन्हा एकदा 4 जूनपासून उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारकडून आमची दिशाभूल करण्यात आली आहे. महायुतीने आम्हाला मराठा आरक्षण दिलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही.

"मोदी-पुतिन यांच्यात फरक नाही"

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानिमित्त शरद पवार अकलूजमध्ये आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी, मोदी आणि पुतिन यांच्यात काहीच फरक नाही अशी टीका केली.

श्री अमरनाथजी यात्रा 29 जूनपासून

यंदाची श्री अमरनाथजी यात्रा 29 जून 2024 पासून सुरू होणार आहे. व 19 ऑगस्ट 2024 रोजी संपणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरुन संवाद साधला

मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरुन संवाद साधला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानची सुरक्षा वाढवण्याची सूचना केली.

Supriya sule : हे गृह खात्याचे अपयश.."; सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर आज (14 एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. "हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे."असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून उभारण्यात येत आहे. तब्बल १२ एकर जागेतील या स्मारकाचे बांधकाम (सिव्‍हिल वर्क) पूर्ण झाले आहे. या ठिकाणी साडेतीनशे फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

Baramati Murder: बारामतीत दांपत्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक

शहरातील खत्री पवार इस्टेटमध्ये शनिवारी (ता. 13) झालेल्या दांपत्यांच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी दिग्विजय गणेश झणझणे (वय 21, रा. खत्री पवार इस्टेट, जामदार रोड, बारामती) यास अटक केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात नागरिक अभिवादन करण्यासाठी येतात. हा बदल १३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून १४ एप्रिल रोजी रात्री दोन वाजेपर्यंत राहील.

थोड्याच वेळात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार; कोणत्या मुद्यावर देणार भर

आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून मतदारांसमोर जाहीरनामा मांडणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह विदर्भ दौऱ्यावर

देशाचे गृहमंत्री अमित शाह आज विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भंडारा गोंदियाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ साकोली येथे प्रचार सभा घेणार आहेत. कालच राहुल गांधी यांची साकोलीमध्ये जाहीर सभा पार पडली होती.

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस उड्डाणपुलावरून कोसळली

नाशिक पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. सिन्नरजवळ गोंदे फाट्यावर खासगी ट्रॅव्हल बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली. खासगी ट्रॅव्हल बस पुण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना पहाटे ६ वाजेदरम्यान हा अपघात झाला.

इराण आणि इस्त्राइल युद्धाला सुरुवात झालीय, शनिवारी मध्यरात्री इराणने इस्त्रायलवर २०० क्षेपणास्त्र डागलेत, भाजपाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणारय, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com