महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक माहेजबीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे लेखापाल मल्लिकार्जुन हिरेमठ, पर्यवेक्षक मनीष बांगर, भगवान मुंडे, सुरेश कासार, रजनी राऊळ, निलोफर सय्यद, तरगिणी कोंडा, महेश वालावलकर आदी उपस्थित होते.
लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याप्रसंगी लिपिक माहेजबीन शेख यांनी उपस्थितांना सांगितले. त्यांच्या विचारांमुळे स्वातंत्र्य लढ्याला धार मिळाली व स्वातंत्र्यसैनिकांचा उत्साह वाढल्याचेही त्यांनी सांगितले.