महाराष्ट्रात पुढील ५ ते ६ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे, नाशिक, अहमदनगरसाठी पुढील ३ तास महत्वाचे असणार आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खानदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.