

Arabian Sea Cyclonic Circulation monsoon rain start
esakal
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात जून महिन्यात मॉन्सून प्रवास मंदावल्याने सरासरीच्या केवळ २२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात तब्बल ७८ टक्के पावसाची तूट निर्माण झाली असून ८ जूनपासून रखडलेल्या मॉन्सूनमुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जूनपर्यंत मॉन्सूनचा जोर कमीच राहणार आहे. २५ जूननंतर परिस्थितीत सुधारणा होऊन १ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरूवात झाली आहे.