दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

देशातील टॉप टेन खासदारांची यादी जाहीर झाली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नंबर वनवर आहेत.
sakal breaking notifiction
sakal breaking notifiction

मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के

मणिपूरच्या मोईरंग येथे आज संध्याकाळी 6 वाजून ५१ मिनिटांनी 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले.

ताहिर हुसेनसह दहा जणांवर आरोप निश्चित

दिल्ली न्यायालयाने ताहिर हुसेन आणि इतर दहा जणांविरुद्ध कट रचणे, दंगल करणे, खून करणे आणि गटांमधील वैर वाढवणे या कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराशी संबंधित हे प्रकरण आहे.

देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक संपली

देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक संपली या बैठकीला काँग्रेस नेते, कपिल सिब्बल देखील या बैठकीला उपस्थित होते.

मुश्रीफांच्या अडचणीत वाढ! आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल

सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार आणखी 25 शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे डीवायएसपी श्रीकांत पिंगळे यांच्याकडे दाखल केली आहे.

24 तासात 1300 कोरोना रुग्णांची नोंद

मागील 24 तासांत देशात 1300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 140 दिवसानंतर सर्वाधिक वाढ आहे.

विधिमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार

विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. अशाप्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधिमंडळाच्या कार्य क्षेत्रात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून विधानसभा अध्यक्षांनी व मुख्यमंत्र्यांनी तातडीनं पावलं उचलली पाहिजे.

मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू; ३ जण जखमी

आंध्र प्रदेश: विशाखापट्टणम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रामजोगी पेटा येथे काल रात्री तीन मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

बिहारसह 4 राज्यात भाजपचे अध्यक्ष बदलले

निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षानं (BJP) आज काही महत्त्वाची बदल केले आहेत. भाजपनं बिहार, दिल्ली, राजस्थान आणि ओरिसामधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी सम्राट चौधरी यांना बिहार भाजपचं अध्यक्ष केलंय. तर, सीपी जोशी यांना राजस्थानचं प्रदेशाध्यक्ष बनवलंय. मनमोहन सामल यांची ओडिशासाठी तर वीरेंद्र सचदेवा यांची दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड

संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र दिलं आहे. त्यामुळं खासदार संजय राऊत यांना संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आलं आहे.

sakal breaking notifiction
Gajanan Kirtikar: संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, किर्तीकरांची नियुक्ती!

पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून लुटले ४७ लाख

पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ४७ लाख रुपये लुटले आहेत. पुण्यातील नाना पेठेत दिवसाढवळ्या तरुणांनी व्यापाराला लुटले. नाना पेठेतील आझाद आळीमधून टू व्हिलर वरून आलेल्या दोघांनी कोयता दाखवून पैशानं भरलेली पिशवी पळवली आहे.

सुरत कोर्टानं दिलेल्या राहुल गांधींच्या निर्णयानंतर मुंबईत काँग्रेस आक्रमक

'चोरों का सरनेम मोदी क्यो होता है…' काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर सर्व नेते भाजपविरोधात निदर्शने करणार आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, भाई जगताप आणि इतर मोठे नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.

पुण्यात ओशो आश्रमाच्या बाहेरचं आंदोलन भोवलं, 125 जणांवर गुन्हा

पुण्यातील ओशो आश्रमाच्या बाहेरचं आंदोलन भोवलं आहे. १०० ते १२५ ओशो अनुयायांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये ओशो भक्तांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काल ओशो आश्रमाच्या बाहेर जोरदार आंदोलन करत ओशो आश्रमात शिरण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून शंभर ते 125 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात सामील

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, आता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) चर्चेत आले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

'मोदी' आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी दोषी, सुरत न्यायालयाचा निकाल

'सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?'... काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या वक्तव्यासाठी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला. राहुल यांनी 2019 मध्ये कर्नाटकमधील सभेत हे वक्तव्य केलं होतं. गुजरातच्या सुरत न्यायालयानं या चार वर्षे जुन्या प्रकरणात गुरुवारी राहुल यांना दोषी ठरवलं. या कारवाईदरम्यान राहुल गांधी न्यायालयात हजर होते.

sakal breaking notifiction
Political News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव BRS मध्ये; पक्षात प्रवेश करताच केली मोठी घोषणा

2024 पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करा - रामदेव बाबा

योगगुरू बाबा रामदेव (Yoga Guru Baba Ramdev) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या केंद्र सरकारकडं देशात समान नागरी संहिता (Uniform Civil Code UCC) आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची (Population Control Act) मागणी केलीये. सरकारनं या दिशेनं लवकरात लवकर प्रभावी पावलं उचलावीत आणि 2024 पूर्वी हा कायदा लागू करावा, असंही ते म्हणाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी

गुढी पाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. वाजीद राजाक सय्यद यांनी ही तक्रार दाखल केली. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.

अयोध्येच्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातून सागवान जाणार

1800 क्युबिक मीटर सागाचे लाकूड 29 मार्चला कास्ट पूजन करून अयोध्येला रवाना होणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली. आलापल्ली येथील सागवानाचं लाकूड जगप्रसिद्ध आहे.

sakal breaking notifiction
Baba Ramdev : 2024 पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करा; रामदेव बाबांचं मोदी सरकारला आवाहन

भाजपनं आपल्या खासदारांना जारी केला व्हीप

सत्ताधारी भाजपनं आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. भाजप खासदारांना आज लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बैठक बोलावली आहे.

राज ठाकरेंच्या आरोपानंतर माहिममधल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

माहीम दर्गा परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवर आयोजित पाडवा मेळाव्यात केला होता. राज ठाकरे यांच्या या आरोपाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. माहीम दर्गा परिसरातील हे अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.

sakal breaking notifiction
Layoffs News : नोकरी देणारी 'ही' कंपनी 2,200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार!

सोनू निगमच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी

गायक सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम यांच्या घरी चोरी झाली आहे. डिजिटल लॉकरमधून 72 लाख रुपये चोरीला गेले आहेत. बहिणीनं तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोडके यांच्यासह ५-६ कार्यकर्त्यांवर मारहाण, तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. वारजे पोलिस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. पुणे शहरातील वारजे भागात गेल्या अनेक वर्षांपासून सचिन दोडके नगरसेवक आहेत.

sakal breaking notifiction
Rahul Gandhi : मोदींचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावताच राहुल गांधींना आठवले महात्मा गांधी

नागपूरमध्ये NIA ने टाकली धाड

नागपूरमध्ये एनआयएने धाड टाकल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे. नागपूरच्या सतरंजीपुरा तसेच हंसापुरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी पहाटे चार वाजताच ही धाड टाकण्यात आली आहे. मोबाईलवरुन पाकिस्तानामध्ये संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली होती. त्याच माहितीवरुन ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे आदेश, माहिम बांधकावर कारवाई सुरु

मुंबईत समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव असल्याचा व्हिडिओ दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि रात्रीत कारवाई करण्याबाबत आदेश काढले. सकाळी 8 वाजता माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यानंतर आज सकाळी संबंधित अधिकारी घटनास्थळी पाहणी केली. आता जिल्हाधिकाऱ्यांनी तोडक कारवाईचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहेत. माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीवर कारवाई करण्यासाठी तोडकाम पथक, अधिकारी दाखल झाले आहेत. माहीमच्या समुद्रात नवं हाजी अली तयार करण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर या मजारची पाहणी करण्यासाठी अधिकारी दाखल झालेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयकडे तोडक कारवाईसाठी आवश्यक यंत्रणा नसल्याने मुंबई महापालिकेचे तोडक कारवाई करणारे कर्मचारी दर्गा परिसरात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता कधीही हातोडा पडण्याचे संकेत आहेत.

अफझल खानाची कबर जमीनदोस्त; राज ठाकरेंनी शिंदे, फडणवीसांचं केलं अभिनंदन

प्रतागडाच्या पायथ्याशी असलेली अफझल खानाची अनधिकृतपणे पसरलेली कबर जमीनदोस्त केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन केलं.

राज्यातील 15 जिल्ह्यांत पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. यामुळं राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 24 तासांत काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदेंना पत्र

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत हे पत्र आहे. बच्चू कडू यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपलं वक्तव्य मागं घ्यावं आणि दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी त्यांनी शिंदेंकडं केली आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना आणखी एक झटका

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. नापिकी कर्जबाजारी आणि गरपिठीला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्या केली. पतीनं गळफास लावून तर पत्नीनं विष घेऊन आत्महत्या केली. संदीप आळेकर आणि लताबाई आळेकर असं शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.

माहिम दर्गा परिसरात पोलीस, पालिकेचे कर्मचारी दाखल

राज ठाकरेंच्या इशारानंतर प्रशासन चांगलंच कामाला लागलं आहे. त्यामुळं मुंबईच्या माहिम दर्गा परिसरात पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी दाखल झाल्याचं कळतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अयोध्येमध्ये जाऊन आले होते.

Maharashtra National Live Updates : काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडली.

या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राज यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं लक्ष असणार आहे. शिवाय, देशातील टॉप टेन खासदारांची यादी जाहीर झाली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नंबर वनवर आहेत. तर श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे अनुक्रमे 8 आणि 9 व्या क्रमांकावर आहेत. आपल्या शेजारील देशात भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. तर, देशात पावसाची स्थिती कायम आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचा आढावा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com