Live Updates: पुण्यातील सेक्स रॅकेटवर पोलिसांनी टाकला छापा; लॉजमधील महिलेसह पुरुष अटकेत

सध्या छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर की स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून अद्याही वाद सुरूच आहे.
Live Updates: पुण्यातील सेक्स रॅकेटवर पोलिसांनी टाकला छापा; लॉजमधील महिलेसह पुरुष अटकेत

पुण्यातील सेक्स रॅकेटवर पोलिसांनी टाकला छापा; लॉजमधील महिलेसह पुरुष अटकेत

पिंपरी चिंचवड येथील रावेत परिसरात लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. तर काळेवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रावेत येथील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सापळा रचत छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे.

दोन बायका केलेल्यांना बुटानेच मारलं पाहिजे, सत्तरांचं जशाचं तसं उत्तर

परिषदेचे विरोधी पक्ष नेत अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सत्तर म्हणाले, दोन बायका केलेल्यांना बुटानेच मारलं पाहिजे. त्यांंमुळे आता दानवे-सत्तार वाद पेटण्याची चिन्ह आहेत.

राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस

चित्रा वाघ यांनी काल पत्रकार परिषद घेवून महिला आयोगावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला होता त्यामुळे आज चित्रा वाघ यांना आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. आणि खुलासा २ दिवसात सादर करण्याची मुदत दिली आहे.

"नारायण राणे, माझ्या नादाला लागू नकोस, तु नामर्द माणूस आहेस"

आज संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘ नारायण राणे, माझ्या नादाला लागू नकोस. कालपर्यंत गप्प होतो. आज तू मर्यादा सोडली आहेस. नामर्द माणूस आहेस. ईडी आसीबीआयच्या भीतीनं पळाला आहे..

शिवडी कोर्टात म्हणून हजर राहिलो नाही; राऊतांचा खुलासा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवडी कोर्टात हजर का राहता आलं नाही याचं कारण स्पष्ट केलं आहे. 'वाहतूक कोंडीमुळे कोर्टात जाऊ शकलो नाही. कोर्टात हजर राहू शकलो नाही याची मनात खंत आहे. कोर्टाचा अवमान केला नाही. " अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; अजामीनपत्र वॉरंट जारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी, भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्हा जेलवारी घडवणार असं विधान केलं होतं. अशातच आज राऊतांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल?, सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी

नवी दिल्ली : भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळेल की नाही, यावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. जर समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली तर भारत जगात अशी मान्यता देणारा ३३ वा देश ठरणार आहे. (Same-Sex Marriage) आज न्यायालयात सुनावणीदरम्यान देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिका वर्ग करण्याच्या याचिकांवर देखील चर्चा होणार आहे.

महिलेच्या अंगावर लघवी करणारा आरोपी फरार

एअर इंडियाच्या (Air India) विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. शंकर मिश्रा असं या व्यक्तीचं नाव असून तो मुंबईस्थित व्यापारी आहे. विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये घडलेल्या या घटनेनंतर फ्लाइट क्रूनं त्या पुरुषाला महिलेच्या सीटजवळ नेलं आणि महिलेची माफी मागण्यास सांगितलं. तिथं त्या व्यक्तीनं महिलेकडं अटक टाळण्यासाठी विनवणी केली. महिलेनं एअर इंडिया ग्रुपचे (Air India Group) चेअरमन एन चंद्रशेखरन यांना 27 नोव्हेंबरला घडलेल्या प्रकाराबद्दल सगळं सांगितलं. मात्र, कंपनीनं 4 जानेवारी रोजी त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये शंकर मिश्रा यानं मद्यधुंद अवस्थेत एका महिलेवर लघवी केल्याचा आरोप आहे.

"न्यूझीलंडमध्ये नोकरी लावतो" असं सांगून पुण्यात उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक

"न्यूझीलंडमध्ये नोकरी लावतो" असं आमिष दाखवत पुण्यात उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक करण्यात आलीये. मल्टी नॅशनल कंपनीमध्ये वरिष्ठ पद मिळवून देतो, असं सांगत ५८ वर्षीय व्यक्तीची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ५८ वर्षीय व्यक्तीनं पोलिसात फिर्याद दिलीये. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र, रिचर्ड अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आमरण उपोषणाला बसलेले मुनी समर्थ सागर यांचं निधन

सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आणखी एका जैन साधूचा मृत्यू झालाय. जयपूरच्या सांगानेर येथील संघीजी जैन मंदिरात 3 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले मुनी समर्थ सागर यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. याआधी मुनी सुज्ञेय सागर महाराज यांनी सम्मेद शिखरासाठी बलिदान दिलं होतं. मुनी समर्थ सागर महाराज (Muni Samarth Sagar Maharaj) यांचं गुरुवारी मध्यरात्री 1.20 वाजता निधन झालं. मुनी सुज्ञेय सागर महाराजांच्या निधनानंतर समर्थ सागर अन्नपाणी सोडून आमरण उपोषणाला बसले होते. आज शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता संघीजी जैन मंदिरातून मुनिश्रींची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये भाविकांचा मोठा सहभाग होता.

छ. संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच, म्हणत राष्ट्रवादी आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. भाजपने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज राष्टवादीकडून वाहनांसाठी काही स्टिकर्सचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे त्या स्टिकर्सवर छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो आहे. आज राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळालं. अजित पवार पुण्यात आहेत. तर राष्ट्रवादीकडून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आणि त्यांचा फोटो असलेले स्टिकर्स वाहनचालकांना वाटण्यात आले आहेत. यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माझ्या नादाला लागू नका, नाही तर...; राऊतांचा राणेंना थेट इशारा

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा सत्ताधारी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी चौफेर टीका करत भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री नाराय़ण राणे यांच्यावरही हल्लाबोल केला. तसेच आपण यापूर्वी राणे यांच्याविषयी काहीही बोललो नाही, असं म्हणत राऊत यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत राऊत म्हणाले की, आदित्यनाथ यांच्याविषयी आज आम्ही आग्रलेख लिहिला आहे. त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. मुंबई देशाचं पोट भरते. येथे देशभरातून लोक पोट भरण्यासाठी येतात. आम्ही त्यांना प्रेमाने सांभाळतोच, असंही राऊत यांनी नमूद केलं. मी नारायण राणेंवर कधीही आग्रलेख लिहिला नाही. ते म्हणत असतील हे कारागृहात जाणार आहेत, तर त्यांनी आमचा कारागृहात जाण्याचा मार्ग मोकळा करू द्यावा. त्यांच्यासारखे आम्ही डरफोक आणि पळपुटे-भित्रे नाहीत. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाहीत, असंही राऊत म्हणाले.

हे शहाणे पार औरंगजेबजी म्हणायला लागलेत; अजित पवारांची भाजपवर टीका

पुणे - अधिवेशन काळात कोणी आक्षेप घेतला नाही. नंतर असं काय घडलं की, दोन-तीन दिवसांनी त्यांची ट्यूब पेटली? कुठला शब्द आक्षेपार्ह आहे? काही आक्षेपार्ह असेल तर लगेच सभागृहात गोंधळ होतो, असं सांगत अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. आव्हाडांनी औरंगजेबबद्दलचं त्यांचं वक्तव्य तातडीनं मागं घेतलं. मीपण सभागृहात दिलगिरी व्यक्त केली, मात्र हे शहाणे पार औरंगजेबजी म्हणायला लागलेत, अशी टीका त्यांनी भाजपवर केलीय.

Rewa Plane crash: मंदिराच्या शिखराला धडकून विमानाचा अपघात; पायलटचा मृत्यू

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंदिराच्या शिखराला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पायलटचा मृत्यू झाला आहे. तर, इंटर्न जखमी झाला. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावात हा विमान अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, प्रशिक्षणार्थी विमान एका मंदिराच्या शिखरावर आदळले, त्यामुळे हा अपघात झाला. विमानाला धडकताच आग लागली. या अपघातात वरिष्ठ पायलटचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमी इंटर्नवर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Russia-Ukraine युध्दाबाबत मोठी बातमी! व्लादिमीर पुतीन युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार, पण..

Russia-Ukraine War News : रशियाकडून युक्रेनसोबतचं युद्ध शुक्रवार ते शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत युद्ध थांबवलं जाणार आहे. या दरम्यान ऑर्थोडॉक्स ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्या संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिलीये. मात्र, युक्रेननं रशियाच्या या शस्त्रसंधीच्या घोषणेला फेटाळलं असून, ही घोषणा म्हणजे ‘जाळ्यात अडकवण्याचा प्रकार’ असल्याचं म्हटलंय. AFP या आंतरराष्ट्रीय वृत्तसेवा संस्थेच्या माहितीनुसार, पेट्रिएक किरिल यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या निमित्तानं शस्त्रसंधीचं आवाहन केलं होतं. आता युध्दाबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. तब्बल 10 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) वाटाघाटी सुरू होऊ शकतात. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चर्चेसाठी तयार असल्याचं वृत्त आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अटीही घातल्या आहेत. याबाबतची माहिती क्रेमलिननं जारी केलीये. रशियानं गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली होती.

अयोध्येतील राम मंदिर पाडून, त्या जागी पुन्हा बाबरी मशीद बांधणार - अल कायदा

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरावर (Ayodhya Ram Temple) दहशतवाद्यांचा डोळा आहे. गजवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात आंतरराष्ट्रीय जिहादी गटानं शपथ घेऊन सांगितलंय की, 'अल कायदा राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधेल.' याशिवाय, जिहादी फीडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओखायला सुरुवात केलीये. यासोबतच भारतीय मुस्लिमांना (Indian Muslims) जिहादला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Kanjhawala Case : तरुणीला फरफटत नेणाऱ्या कारच्या मालकाला अटक

kanjhawala accident girl death दिल्लीतील कंझावाला येथे कारखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गाडी मालक आशुतोषला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

Live Updates News : सध्या छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर की स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून अद्याही वाद सुरूच आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलीये. आजही या मुद्द्यावरून शाब्दिक चकमकी उडण्याची चिन्हं दिसत आहेत. तसंच महाराष्ट्रातही राजकीय घडामोडी वेगात घडत आहेत. याशिवाय, राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com