

Maharashtra Rain Forecast alert
esakal
Maharashtra Monsoon Update : राज्यातील बहुतांश भागात पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी कोकण आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी (ता. ४) भिरा येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे २२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून उजनी, कोयना, अलमट्टीसह अनेक धरणांतून विसर्ग सुरूच आहे.