esakal | कोरोना लाटेने महाराष्ट्र सदनात शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Sadan

कोरोना लाटेने महाराष्ट्र सदनात शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - नेहमी लखलखणारी हंड्याझुंबरं पुन्हा एकाकी झाली आहेत. दर्शनी भागात लावलेल्या भव्य समस्यांची झळाळी उदास भासत आहे. ये-जा करणाऱ्यांची अत्यल्प वर्दळ जाणवत आहे राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन महाराष्ट्र सदनातील हे शांत चित्र कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या दिसत आहे.

दिल्लीत लॉकडाउनला सुरवात झाली आहे. मात्र रुग्णसंख्येचा वाढता आकडा आणि संपूर्ण देशातच उडालेला कोरोना कहर यांचा परिणाम महाराष्ट्र सदनात येणाऱ्या पाहुण्यांवर अपरिहार्यपणे झाला आहे. एरव्ही दिल्लीत महाराष्ट्र सदनात येणाऱ्यांमध्ये राज्यातील मंत्री, आमदार, राजकारणी, पत्रकार, सरकारी अधिकारी यांची वर्षभर वर्दळ असते. दिल्लीत महाराष्ट्र सदन आणि त्याच्या भव्यतेचा प्रभाव देशातील भल्याभल्या नेत्यांवर पडला आहे. सदनाचा, त्याच्या भव्यतेचा लौकिक ऐकून येथे फक्त जेवणासाठी येणाऱ्यांची संख्याही एरवी लक्षणीय असते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून या संख्येत घट होत होत आता एक विचित्र शुकशुकाट जाणवत आहे. राज्यातून या ना त्या कामानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांची संख्या संख्या कमी कमी होत ती रोज ५० ते ६० वरून सध्या दोन ते तीनवर आली आहे. बाहेर कडक लॉकडाउन असल्याने येणाऱ्या पाहुण्यांना भेटल्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

हेही वाचा: कायदे रद्द केल्याशिवाय घरी परतणार नाही: राकेश टिकैत यांचा निर्धार

दोन्ही महाराष्ट्र सदनांमधील उपाहारगृहेही आठवडाभरापासून बंद आहेत. ज्यांना मराठी खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ‘टेक होम’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि तशी नोटीस दोन्ही सदनांच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सदनात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या कोरोनाच्या नव्या तडाख्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून रोडावली आहे. नेहमी राहणारे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याशिवाय इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता सदनात येणाऱ्या व राहणाऱ्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. सॅनिटाइझ करूनच प्रवेश दिला जात आहेत. शासनाच्या सूचनांचे पालन केले जात असल्याचा दावा सदनाच्या प्रशासनाने केला आहे.

महाराष्ट्र सदनात येणाऱ्या अभ्यागतांचा कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्यावरच परवानगी दिली जात आहे.

- प्रमोद कोळप्ते, निवास अधिकारी, महाराष्ट्र सदन.

loading image