esakal | कायदे रद्द केल्याशिवाय घरी परतणार नाही: राकेश टिकैत यांचा निर्धार

बोलून बातमी शोधा

rakesh tikait
कायदे रद्द केल्याशिवाय घरी परतणार नाही: राकेश टिकैत यांचा निर्धार
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी घरी परतणार नाही. आंदोलनाची जागा आता शेतकऱ्यांचे घर बनली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी या ठिकाणीच सुरू करावे, असे भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. नवीन शेती कायद्याच्या विरोधात शेकडो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आहेत. शेतकरी आंदोलनासाठी एकत्र येत असल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर टिकैत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा: ३५ वर्षांपूर्वी झाली होती पहिली शेतकरी आत्महत्या, आज एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन

टिकैत म्हणाले, ‘‘आंदोलन स्थळ हेच आता शेतकऱ्यांचे घर झाले आहे. ते सोडून त्यांना कुठे जायला सांगणार? कोरोनाचा फैलाव काय येथून होतोय का? हे तर आमचे घर आहे. अनेक शेतकऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अनेक जण दुसरा डोस मिळावा म्हणून झगडत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी येथेच लसीकरण सुरू करावे.’’

हेही वाचा: शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रेल्वेस्थानकावर आंदोलन; आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झटापट

इफ्तारवेळी शेतकऱ्यांची कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला जात आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहो. त्यावर टिकैत म्हणाले, की पन्नास जणांना एकत्र येण्यास सरकारची परवानगी आहे. तिथे फक्त २२ ते ३५ लोक होते. तेही पुरेसे अंतर ठेऊन बसलेले होते. कुणी कुणास भेट नाही आणि हस्तांदोलनही केले नाही.