राजपथावरील संचलनात यंदा ‘संत मेळा’ 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 20 January 2021

कोरोना महामारीमुळे मागील वर्षी पंढरपूरच्या दोन्ही वाऱ्या रद्द कराव्या लागल्या तरी यंदा प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत राजपथावरील संचलनात ‘विठू माझा लेकुरवाळा''च्या दर्शनाला जाणाऱ्या गोपाळांच्या मेळ्याचे दर्शन घडणार आहे. ‘संतांचा मेळा'' या संकल्पनेवर आधारित राज्याच्या चित्ररथाच्या निर्मितीचे काम दिल्लीच्या कॅन्टोन्मेंट भागातील चित्ररथ नगरीत सध्या अंतिम टप्प्यात आहे.

नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे मागील वर्षी पंढरपूरच्या दोन्ही वाऱ्या रद्द कराव्या लागल्या तरी यंदा प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत राजपथावरील संचलनात ‘विठू माझा लेकुरवाळा''च्या दर्शनाला जाणाऱ्या गोपाळांच्या मेळ्याचे दर्शन घडणार आहे. ‘संतांचा मेळा'' या संकल्पनेवर आधारित राज्याच्या चित्ररथाच्या निर्मितीचे काम दिल्लीच्या कॅन्टोन्मेंट भागातील चित्ररथ नगरीत सध्या अंतिम टप्प्यात आहे. पश्‍चिम बंगालमधील कन्याश्री उपक्रमावर आधारित सबूज साथी हा चित्ररथ सहभागी झाल्यास तोही यंदा चर्चेचे केंद्र ठरणार अशी चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागपूरच्या राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० कलाकार हा चित्ररथ साकारत आहेत. त्यातील संकल्पनाचित्र व त्रिमिती प्रतिकृती रोशन गुले व तुषार प्रधान या तरुणांनी तयार केल्या आहेत. नरेश चरडे व पंकज इंगळे हे कलादिग्दर्शक आहेत. चित्ररथाच्या सुरवातीला संत ज्ञानेश्‍वर महाराजांची ८ फुटांची मूर्ती आहे. मध्यभागी भक्ती व शक्ती या संकल्पनेवर आधारित ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची ऐतिहासिक भेट’ दर्शविणारा देखावा असेल. त्यापाठोपाठ पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची साडेआठ फुटांची लोभस मूर्ती आहे. अखेरच्या भागात संतांची वचने व काव्यपंक्तींचा संतवाणी हा ग्रंथ आहे. चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना संत नामदेव, जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी महाराज, चोखामेळा आदी संतांच्या मूर्ती आहेत. 

भारत-अमेरिका मैत्रीचं नवं पर्व; PM मोदींचा US राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना खास संदेश!

गेल्या वर्षी संचलनात राज्याचा चित्ररथ नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. राजपथावर चित्ररथांची परंपरा सुरू झाल्यावर सुरवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरलेला आहे.

पती, पत्नी और वो; डोशाने केला घात, पत्नीची पोलिसांत धाव

उज्ज्वल यशाची परंपरा
राज्याच्या शिवराज्याभिषेक या चित्ररथाला १९८० मध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता. १९८३ मध्ये बैलपोळा या चित्ररथानेही पारितोषिक पटकावले होते. १९९३, १९९४, १९९५ अशी सलग तीन वर्षे राज्याच्या चित्ररथांनी देशात प्रथम येण्याची हॅटट्रीक केली. यातील एका वर्षीचा चित्ररथ तर पंढरपूरच्या वारीवरच साकारण्यात आला होता. अलीकडे २०१८ मध्ये राज्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state tableau the rajpath ceremonial republic day