'महाराष्ट्राच्या एसआयटीचा कर्नाटकशी संपर्क नाही'

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या गटाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकशी अद्याप संपर्क साधलेला नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले. 

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या गटाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकशी अद्याप संपर्क साधलेला नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले. 

गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमरे (वय 26) व श्रीराम सेनेच्या अन्य कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गटाने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गौरी लंकेश व महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, कन्नड साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी समान हत्यार वापरण्यात आल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या चौकशी करणाऱ्या "एसआयटी'ने कर्नाटकातील "एसआयटी'शी संपर्क साधलेला नाही, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: Maharashtra's SIT does not have contact with Karnataka