शाकाहारावरून सावरकरांनी गांधीजींची केली होती चेष्टा, श्रीरामावरून झालेले मतभेद

महात्मा गांधी आणि विनायक दामोदर सावरकर हे दोन्ही वेगवेगळी व्यक्तीमत्वे होती. पण, दोघांची हिंदू धर्मावर अतूट श्रद्धा होती
SAWARKAR AND MAHATMA GANDHI
SAWARKAR AND MAHATMA GANDHI

नवी दिल्ली- महात्मा गांधी आणि विनायक दामोदर सावरकर हे दोन्ही वेगवेगळे व्यक्तीमत्व होते. पण, दोघांची हिंदू धर्मावर अतूट श्रद्धा होती. दोन्ही नेत्यांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा होता. त्यांची हिंदू धर्माची व्याख्या देखील वेगळी होती.

महात्मा गांधी आणि विनायक सावरकर यांची पहिली भेट १९०९ मध्ये लंडनमधील एका कार्यक्रमात झाली होती. दसऱ्याच्या निमित्त्याने निवासी भारतीयांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विनायक सावरकर लंडमध्ये शिक्षणासाठी गेले होते. ते त्यांचे मोठे बंधू नारायण सावरकर यांच्यासोबत कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांची भेट महात्मा गांधी यांच्यासोबत झाली होती.

SAWARKAR AND MAHATMA GANDHI
Jitendra Awhad: बोलण्याच्या ओघात बोलून गेलो, पण वाल्मिकी रामायणमध्ये...; जितेंद्र आव्हाड स्पष्ट बोलले

दसऱ्याच्या कार्यक्रमात महात्मा गांधी रामाबाबत बोलले होते. प्रभु राम निस्वार्थ आणि मैत्रीचे प्रतिक होते. प्रभू राम मानव कल्याणाच्या सहिष्णू शक्तीचे रुप आहेत, असं महात्मा गांधी म्हणाले होते. तर, सावरकरांनी प्रभू रामांना संहारक रुप म्हणत वाईट गोष्टींना संपवणारी शक्ती म्हटलं होतं.

सावरकर आणि महात्मा गांधी यांचा मार्ग पूर्णपणे वेगवेगळा होता. महात्मा गांधी अविभाजित स्वतंत्र भारताच्या कल्पनेवर विश्वास ठेवायचे. दुसरीकडे, सावरकर यांना हिंदू राष्ट्र बनवायचा होता. काही मुद्द्यांवर त्यांचे एकमत देखील होते. अस्पृश्यता नष्ट व्हावी यावर दोघांचा भर होता. तसेच स्त्री-पुरुष श्रम अधिकार सारखे असावेत असंही दोघांना वाटायचं

महात्मा गांधी आणि सावरकर यांची लंडनमध्ये जेव्हा पहिल्यांदा भेट झाली होती, तेव्हा गांधी हे महात्मा नव्हते. ते केवळ मोहनदास करमचंद गांधी होते. त्यावेळी त्यांनी अद्याप भारतात येऊन आपले कार्य सुरु केले नव्हते, असं द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राईट या पुस्तकाचे लेखक निलांजन मुखोपाध्याय सांगतात.

SAWARKAR AND MAHATMA GANDHI
Jitendra Awhad On Ram: श्री रामाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी; रोहित पवारांचा घरचा आहेर

बीबीसीने मुखोपाध्याय यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत सांगितलं की, गांधी-सावरकर यांच्या लंडनमध्ये भेटी होत राहिल्या. एकदा सावरकरांनी गांधींना जेवणासाठी बोलावलं होतं. पण, गांधींनी हे सांगत नकार दिला की, ते मांस आणि मासे असं काहीही खात नाहीत. सावरकरांनी त्यांच्यासाठी झींगा मासा बनवला होता.

सावरकरांनी महात्मा गांधी यांची चेष्टा देखील केली होती. जो मांस खात नाही तो इंग्रजांच्या ताकदीला आव्हान कसा देऊ शकेल? त्या रात्री महात्मा गांधी सावरकर यांच्या घरी जेवण न करता आणि सत्याग्रह आंदोलनासाठी कोणत्याही समर्थनाशिवाय तेथून निघून आले होते. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com