Mahatma Gandhi Punyatithi : ७४ वर्ष उलटली तरी महात्मा गांधीचे मारेकरी अद्याप मोकाटच? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma Gandhi Punyatithi :

Mahatma Gandhi Punyatithi : ७४ वर्ष उलटली तरी महात्मा गांधीचे मारेकरी अद्याप मोकाटच?

एखाद्या व्यक्तीची हत्या झाली तर त्याचे मारेकरी कोण?, याचा तपास करण्यात पोलिस अथक प्रयत्न करतात. काही प्रकरणात खूनी सापडला नाही तर लोकांना, मिडियाला उत्तर देता देता पोलिसांना नाकीनऊ येतात.पण, आजवर कोणी पोलिसांना महात्मा गांधीजींचे मारेकरी आजवर का पकडले गेले नाहीत, असा सवाल केला आहे का?

महात्मा गांधीना जाऊन आता ७४ वर्षे उलटली. त्यांची हत्या ३० जानेवारी १९४८ मध्ये नथुराम गोडसे यांने केली होती. एवढीच माहिती आपल्याला आहे. पण, त्यांच्या हत्येत अजून बऱ्याच जणांचा समावेश होता. त्यातील काही आरोपी आजही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.(Mahatma Gandhi Punyatithi : central information commission orders search of three absconders charged with gandhis murder )

गांधींजींना मारण्याच्या कटात सहभागी असलेले तीन आरोपी मोकाट फिरत असल्याची माहिती २०२२ मध्ये समोर आली आहे. महात्मा गांधीजींचे पणतू तूषार गांधी यांनी याबाबत आवाज उठवला होता.

३० जानेवारी १९८ च्या संध्याकाळी महात्मा गांधींची हत्या झाली. त्यानंतर गांधीजींच्या हत्येच्या आरोपात १२ लोकांना पकडण्यात आले होते. १९४८ मध्ये जेव्हा गांधीजींच्या हत्येचा खटला सुरू होता. त्यावेळी जेव्हा गांधी हत्येप्रकरणी खटला सुरु होता. तेव्हा नथुराम गोडसेशिवाय इतर ११ जणांना आरोपी ठरविण्यात आले होते. या १२ जणांपैकी ९ जणांना शिक्षा झाली. तर त्यातील तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

गांधीजींच्या हत्येमध्ये हात असलेले गंगाधर दंडवते, गंगाधर जाधव आणि सूर्यदेव शर्मा हे तीन आरोपी तेव्हापासून फरार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरक्षा आणि सुव्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. तरीही या तिघांचा शोध घेणं पोलिसांसाठी अवघड बनले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अवघ्या एकाच वर्षात बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थनेसाठी जात असलेल्या गांधीजींवर पॉइंट ब्लँक रेंजमधून तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्या नथुराम गोडसे याने बरेटा पिस्तुलातून झाडल्याचे सांगितले जाते.

सुरक्षा रक्षक तैनात असतानाही गोडसेकडे पिस्तूल कसे पोहोचले, याचाही तपास आजवर लागला नाही. तुषार गांधीं यांच्या म्हणण्यानुसार, या तीन फरार आरोपींनीच गोडसेपर्यंत पिस्तूल पुरवले.

या तीन आरोपींना कधीच पकडण्यात आले नव्हते असे नाही. तर, ज्या दिवशी पंजाब उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा या तीन फरारी आरोपींना ग्वाल्हेरमधून अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी सबब देत त्यांना सोडण्यात आले.

आता केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित प्रत्येक पैलूचे दस्तऐवज असलेले संग्रहण तयार करण्यास सांगितले आहे. ज्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित कागदपत्रेही सार्वजनिक करण्यात यावीत. असे आदेशही देण्यात आले आहेत.