
Mahatma Gandhi Punyatithi : नक्की कसे आले महात्मा गांधी आपल्या नोटेवर? वाचा इतिहास
Indian Currency Notes: भारताला स्वातंत्र मिळण्यापूर्वी इथल्या नोटांवर, ब्रिटिश राजा जॉर्ज सहावा याचे चित्र होते, पण १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर या ब्रिटीश राजाचे पोर्ट्रेट महात्मा गांधींच्या चित्राने बदलले पाहिजे असे तत्कालीन मत होते, पण यावरती तेव्हा एकमत झालं नाही. दरम्यान, राजाचे पोर्ट्रेट सारनाथमध्ये असलेल्या लायन कॅपिटलने अर्थात अशोक स्तंभाने बदलले.
गांधीच्या फोटो पूर्वी नोटांवर होते यांचे फोटो:
गांधींच्या फोटोपूर्वी चलनी नोटांवर अनेक रचना आणि प्रतिमा वापरल्या जात होत्या.
१९४९ मध्ये तत्कालीन सरकारने अशोक स्तंभासह नवीन डिझाईन असलेली १ रुपयाची नोट बाजारात आणली. उच्च मूल्याच्या नोटा (रु. १,०००, रु. ५,०००, रु. १०,०००) १९५४ मध्ये परत सुरू करण्यात आल्या.
१,००० रुपयांच्या चलनी नोटेवर तंजोर मंदिर, ५,००० रुपयांचे गेटवे ऑफ इंडिया आणि १०,००० रुपयांचे लायन कॅपिटल, अशोक स्तंभाचे स्वरूप छापण्यात आले. पण नंतर या उच्च मूल्याच्या चलनी नोटा १९७८ मध्ये बंद करण्यात आल्या.
रिझर्व्ह बँकेने १९६९ मध्ये सेवाग्राम आश्रमाच्या पार्श्वभूमीवर बसलेले स्थितीतले महात्मा गांधी दर्शविणारी १०० रुपयांची नोट छापण्यात आली.
१९८० च्या दशकात नोटांचा पूर्णपणे नवीन संच दिसला. या नोटांवरची डिझाईन आधीच्या नोटांपेक्षा वेगळी होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान (२ रुपयांच्या नोटेवर आर्यभट्ट), प्रगती (१ रुपयांवर ऑइल रिग आणि ५ रुपयांवर फार्म यांत्रिकीकरण) आणि १० अन् २० रुपयांच्या नोटांवर भारतीय कला प्रकारांवर भर देण्यात आला.
राष्ट्रपिता यांचा फोटो १९८७ मध्ये चलनी नोटांवर नियमित दिसला जेव्हा त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हसतमुख गांधी दर्शविणारी ५०० रुपयांच्या नोटांची सिरिज सुरू झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या मूल्यांच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो नियमितपणे वापरला जातो आहे.
शेवटी १९९६ मध्ये रीप्रोग्राफिक तंत्राच्या प्रगतीमुळे, पारंपारिक सुरक्षा वैशिष्ट्ये बदलण्याची गरज असल्याने RBI ने त्यात सुधारणा केली आणि नवीन 'महात्मा गांधी सिरिज' सादर करण्यात आली.