Gandhi Jayanti 2022 : 'या' टिप्सने करा भाषण अन् मनं जिंका

गांधीजींच्या अहिंसा, सत्य, शांती आणि उच्च नैतिकशास्त्रावरचा अतुट विश्वासाने त्यांना स्वतंत्रता आंदोलनाचा नेता बनवले.
Gandhi Jayanti 2022
Gandhi Jayanti 2022 esakal

Gandhi Jayanti 2022 : महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबरला संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. गांधीजींच्या अहिंसा, सत्य, शांती आणि उच्च नैतिकशास्त्रावरचा अतुट विश्वासाने त्यांना स्वतंत्रता आंदोलनाचा नेता बनवले.

Gandhi Jayanti 2022
Gandhi Jayanti 2022: गांधीवादातून आपण काय शिकले पाहिजे?

या दिवशी शाळा, कॉलेज किंवा अगदी सामाजिक कार्यक्रमात बापूंच्या जीवनावर, जीवनशैलीवर, तत्वांविषयी आवर्जून बोलले जाते. यानिमित्त लाहानग्यांपासून थोरांपर्यंत अनेक जण भाषणे देतात. निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावेळी तोच तो पणा न येता आपले वेगळेपण उठून दिसण्यासाठी काही खास टिप्स घेऊन आले आहोत.

Gandhi Jayanti 2022
Gandhi Jayanti : बापूकुटी ‘शहरा’पासून दुरावली

भाषणासाठी आवश्यक टिप्स

  • आपले भाषण किंवा निबंध संक्षिप्त ठेवा.

  • कोणत्याही कमतरता राहू नयेत याची काळजी घेत पुन्हा पुन्हा वाचा.

  • सोप्या भाषेत असावं.

  • सहज, कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासाने म्हणने मांडा.

  • असे शब्द लिहा जे तुम्ही जोशपूर्ण आणि उत्साहाने बोलू शकतात. आणि समोरच्यात जोश निर्माण करेल.

Gandhi Jayanti 2022
Gandhi Jayanti : कापडात घ्या खादी...!

हे मुद्दे असावे

  • शुभ प्रभात करावं.

  • कोणाविषयी बोलणार आहोत, म्हणजे महात्मा गांधी कोण होते अशा एखाद्या विशेषणाने उल्लेख करावा.

  • या यास दिवसाचे वैशिष्ट्य काय ते सांगावे.

  • मग जीवन प्रवास थोडक्यात सांगावा.

  • जीवनातल्या ठळक घटना, त्याचे महत्व, आजच्या काळाशी संबंध जोडता आल्यास तो कसा ते सांगावं.

  • त्यांनी साकारलेली महत्वाची भूमीका, महत्व पटवून द्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com