
Gandhi Statue With BJP Cap At NDA Camp Triggers Political Row
Esakal
बिहारमध्ये एनडीए कार्यकर्त्यांचं शिबिर पार पडलं. मुजफ्फरपूरमध्ये या शिबिरावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला भाजपची टोपी घालण्यात आली होती. तसंच पक्षाचं चिन्ह असलेला झेंडाही पुतळ्याला बांधला होता. या शिबिरात शाहनवाज हुसैन, जदयू कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्यासह अनेक एनडीएचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. महात्मा गांधींच्या पुतळ्याला पक्षाची टोपी, गळ्यात मफलर आणि पक्षाचा झेंडा लावल्यानं नवा वाद निर्माण झालाय. विरोधकांनी यावर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.