
गोव्यातही होणार महाविकास आघाडीचा प्रयोग; संजय राऊतांनीच स्पष्ट सांगितलं
पणजी: गोवा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापलं आहे. गोव्यात देखील काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. गोव्यातही आता महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. या फक्त अफवा नसून याबाबत खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच ट्विट करत खुलासा केला आहे.
हेही वाचा: म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; MPSCची ढकललेली परीक्षा होती त्याच दिवशी
संजय राऊत यांनी आज ट्विट करत म्हटलयं की, आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा: पंकजा मुंडे अन् प्रणिती शिंदेंचं ठरलंय, रोहित पवार म्हणाले...
दरम्यान गोव्यात आपली सत्ता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. दुसरीकडे गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेससोबत असून शिवसेनेला एकत्र घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचं सुतोवाच संजय राऊत यांनी केलं आहे. दुसरीकडे गोव्यात प्रवेश करु पाहणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत युती केली आहे. राज्यात निवडणुकांचे पडघम जोरात वाजत असून राजकीय वातावरणातील तणाव टीपेला पोहोचला आहे.
Web Title: Mahavikas Aghadi Experiment To Be Held In Goa Too Sanjay Raut Himself Made It Clear
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..