पंकजा मुंडे अन् प्रणिती शिंदेंचं ठरलंय, रोहित पवार म्हणाले...

Praniti Shinde Rohit Pawar Pankaja Munde
Praniti Shinde Rohit Pawar Pankaja MundeSakal

राजकीय मैदानात आपापल्या पक्षासाठी बॅटिंग करणारी आणि राज्यात विशेष छाप सोडणारी राजकीय व्यक्तीमत्व एका व्यासपीठावर येतात तेव्हा चर्चेचा विषय ठरणार यात शंकाच नाही. 'झी मराठी'वरील 'किचन कल्लाकार' कार्यक्रम याची अनुभूती येणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) ही मंडळी एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात या तीन लोकप्रिय व्यक्तीमत्वामध्ये संगीत खुर्चीचा डाव रंगल्याचे पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय. यात संगीत खुर्चीच्या खेळात रोहित पवार खुर्चीच्या जवळ असताना त्यांनी खुर्चीचा त्याग केल्याचं दिसून आले. प्रणिती शिंदे आणि पंकजा मुंडे यांनी खुर्ची पकडण्यात यश मिळवले असले तरी खुर्ची सोडताना रोहित पवारांनी मारलेला डायलॉग खास असाच आहे. रोहित पवार यांना खुर्चीचा त्याग का केला? असं ज्यावेळी विचारण्यात आलं. त्यावेळी रोहित पवार म्हणाले की, किंगमेकर होण्यासाठी कधी कधी खुर्ची त्याग करावी लागते.

Praniti Shinde Rohit Pawar Pankaja Munde
'किचन कल्लाकार'ला राजकीय वळण;पंकजा मुंडे अनं रोहित पवार यांच्यात भीडत

पंकजा आणि प्रणिती शिंदे यांच्यात खेळ पुढे सुरु राहिला. यात तू जिंकायचं नाही असं पंकजांनी प्रणिती शिंदेंना म्हटलं. मात्र प्रणिती शिंदेंनी शेवटी बाजी मारली. जिंकल्यानंतर आपण खुर्ची शेअर करू असं त्या मोठ्या मनाने पंकजा मुंडेना म्हणाल्याचेही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

Praniti Shinde Rohit Pawar Pankaja Munde
हसन मुश्रीफ,सतेज पाटलांनी आमचा वापर केला; सेनेचा आरोप

तीन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांमधील संवाद हा लक्षवेधून घेणारा असाच आहे. संगीत खुर्चीचा खेळ सुरु होण्यापूर्वी रोहित पवारांनी पंकजा मुंडेसोबत युती करण्याची तयारीही दर्शवली. जर पंकजा मुंडेंना काही अडचण नसेल तर मला काही हरकत नाही, असे ते म्हणाले. यावर प्रणितींनी केलेला संवादही लक्षवेधी ठरतोय. सगळ्या गोष्टी सार्वजनिकरित्या सांगायच्या नसतात आमच्यात आधीच ठरलंय असं म्हटल्यावर उपस्थिती प्रेक्षकांमध्ये हसू फुलल्याचे पाहायला मिळलेत. प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार आम्हाला का नाही बर सांगितलं, असे म्हणताना दिसते.

प्रणिती शिंदेंनी युतीवर टिपिकल प्रतिक्रिया देत मला वरिष्ठांशी बोलावं लागेल असं उत्तर दिलं. तर पंकजा मुंडे यांनी मला याबाबत वरिष्ठांशी बोलावं लागणार नाही असं उत्तर दिलं. तसंच प्रणिती आणि पंकजाची युती व्हायला काही हरकत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तेव्हा त्यांना थांबवत रोहित पवार यांनी मी खुर्ची त्याग केली, तर दोघींनी मला त्या खुर्चीसाठी मदत करायची असं रोहित पवार म्हणाले. आता ती खुर्ची कोणती हे कार्यक्रमातच समजेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com