
Mahua Moitra Marriage: तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोईत्रा यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. ५० वर्षांच्या मोईत्रा यांनी एका खासदारासोबत लग्नगाठ बांधली आहे. जर्मनीत एका छोट्याशा सोहळ्यात त्यांचा विवाह पार पडला आहे. या लग्नाचा एक फोटो देखील समोर आला आहे. मात्र, अद्याप मोईत्रा यांच्याकडून अधिकृतरित्या याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. द टिलिग्राफनं याबाबत वृत्त दिलं आहे.