Mahua Moitra: एनर्जी कशातून मिळते? महुआ मोईत्रांच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर

Viral Video: आता अशाच एका प्रकरणात टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा मोईत्रा यांच्याबाबत एक दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्या गोत्यात येण्याची शक्यता आहे.
Mahua Moitra Viral Video
Mahua Moitra Viral VideoEsakal

देशात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवार प्रचाराची राळ उठवत आहेत. अशात विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते विरोधी पक्ष आणि विरोधी उमेदवारांबाबत सोशल मीडियावर उलट-सुटल चर्चा करत असतात.

आता अशाच एका प्रकरणात टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा मोईत्रा यांच्याबाबत एक दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्या गोत्यात येण्याची शक्यता आहे.

महुआ मोईत्रा यांनी आपल्या प्रचारादरम्यान द ट्रूथ चॅनलच्या तमल शहा यांना एक मुलाखत दिली होती.

या मुलाखतील पत्रकाराने मोईत्रा यांना प्रश्न विचारला होता की, तुमच्यामध्ये इतकी एनर्जी कशी काय आहे? यावर मोईत्रा, इट्स सेक्स म्हणाल्याचा दावा एक्सवर एका युजरने, केला आहे.

मात्र, आता एक्स युजरच्या या दाव्याला मोईत्रा यांची मुलाखत घेण्याऱ्या पत्रकाराने उत्तर देत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

या युजरने एक्स प्लॅटफॉर्मवर मोईत्रा यांच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग पोस्ट केला आहे. त्याबरोबर त्याने लिहिले आहे की, मुक्त पत्रकार तमल शाहा आणि कृष्णनगरच्या तृणमुल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्यात संभाषण ऐका.

दरम्यान, हा व्हिडीओ चुकीच्या अर्थाने सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, ही मुलाखत घेणारे पत्रकार तमल शाहा आता पुढे आले आहेत. व त्यांनी संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

Mahua Moitra Viral Video
Sharad Pawar : लोकशाही संपविण्यास निघालेल्या उन्मादी सरकारला उलथवून टाका
Mahua Moitra Viral Video
Supreme Court : ''प्रत्येकाला मतदानाची स्लिप मिळाली तर?'' सुप्रीम कोर्टाचा प्रश्न अन् निवडणूक आयोगाने सांगितला धोका

एक्स युजरच्या पोस्टला रिपोस्ट करत पत्रकार तमल शाहा म्हणाले, प्रिय @KanchanGupta, सकाळी विटामिन कॅप्सूल समजून वियाग्रा घेणे बंद करा. या वयात असले काम करत नाहीत, आणि तुम्ही मात्र, फक्त त्याचाच विचार करता. महुआ मोईत्रा या व्हिडीओमध्ये 5.6 सेकंदाला 'इट्स एग्स' असे म्हणाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com