ED Attacked: ईडीच्या आधिकाऱ्यांवर हल्ला करणारा मुख्य आरोपी देश सोडुन पळुन गेला?

All India Trinamool Congress
All India Trinamool Congress sakal

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर पश्‍चिम बंगालमध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख हे देशाबाहेर पळून गेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदबोस यांनी शहाजहान शेख यांना तातडीने अटक करण्याची व त्यांचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध तपासण्याचे आदेश दिले आहेत.

राजभवनाकडे शहाजहान शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी रात्री राजभवनाच्या वतीने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.दरम्यान, शहाजहान शेख यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता राज्यपाल बोस यांनी व्यक्त केल्याबद्दल तृणमूल काँग्रेसने रविवारी टीका केली आहे.

All India Trinamool Congress
Kiran Mane in Politics: अभिनेते किरण मानेंनी शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; बोलताना म्हणाले, "राजकारण गढूळ..."

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, ‘‘राज्यपालांनी कोणत्या आधारावर हे आरोप करणारी विधाने केली हे माहीत नाही. राज्यघटनेनुसार त्यांनी राज्य सरकारच्या सल्ल्यानेच काम करणे अपेक्षीत आहे, मग असे असताना त्यांनी पुराव्यांशिवाय अशी विधाने कशी केली? दरम्यान, ईडीनेही शहाजहान शेख हे परदेशात पळून गेले असल्याची शंका व्यक्त करत त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस बजावली आहे.

All India Trinamool Congress
West Bangal : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीकडून पार्थ चॅटर्जींना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com