भाऊबीजेची तयारी सुरू असताना दुर्घटना! चहा पिताच सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhai Dooj news in Marathi

भाऊबीजेची तयारी सुरू असताना दुर्घटना! चहा पिताच सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील एका घरावर भाऊबीजेच्या दिवशी दु:खाचा डोंगर कोसळला. दोन सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चौघांचा मृत्यू चहा प्यायल्याने झाल्याचं सांगण्यात आलं आहे. (Bhai Dooj news in Marathi)

हेही वाचा: Accident news: ऐन दिवाळीच्या काळात तवेरा गाडीला भीषण अपघात; पाच जण ठार

औंचा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. नागला कन्हई येथील एका घरात बनवलेल्या चहाने दोन निष्पाप मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला सैफईला उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नागला कन्हई गावातील शिवानंदन यांच्या घरी भाऊबीजेची तयारी सुरू होती. फिरोजाबाद येथे राहणारे त्यांचे सासरे रवींद्र सिंह हे घरी आले होते. सर्वजण चहा प्यायला बसले होते. चहा प्यायल्यानंतर रवींद्र सिंह यांची तब्येत अचानक बिघडली. ते बेशुद्ध पडले. तेवढ्यात सहा वर्षाचा मुलगा शिवानंद आणि पाच वर्षाचा दिव्यांश यांचीही प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तातडीने तिघांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर आणखी एकाचा मृत्यू झाला. या घटनेत एकूण चौघांचा मृत्य झाला.

हेही वाचा: Tata Airbus: एअरफोर्ससाठी आता टाटा बनवणार विमान; PM मोदींच्या हस्ते होणार उद्धाटन

दरम्यान चहातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. चहा बनवणाऱ्या महिलेकडून चहापत्ती ऐवजी चहा बनवताना किटकनाशक पडले. ज्यामुळे ही दुर्घटना घडली.