Tata Airbus: एअरफोर्ससाठी आता टाटा बनवणार विमान; PM मोदींच्या हस्ते होणार उद्धाटन

टाटा एअरबसकडे भारतीय हवाई दलासाठी विमान बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सैन्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
Air Force
Air Force

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलासाठी C 295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसकडे सोपवण्यात आली आहे. वडोदरा येथील फॅक्टरीत कंपनी हे विमान बनवणार आहे. अशी माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Tata will now make aircraft for Indian Air Force plant will be inaugurated by PM Modi)

हे विमान संपूर्ण भारतीय बनावटीचं विमान असणार आहे. भारतात तयार झालेल्या विमानांची पूर्तता सन २०२६ पासून २०३१ पर्यंत केली जाणार आहे. यांपैकी १६ विमानं २०२३ ते २०२५ दरम्यान येणार आहेत. यामुळं भारतीय हवाई दलांकडे C 295 ट्रान्सपोर्ट विमानांची सर्वात मोठी फ्लीट असेल.

Air Force
Bacchu Kadu: "दुश्मन का दुश्मन दोस्त होता है"; खोके प्रकरणी अनिल परब यांच्या बच्चू कडूंना शुभेच्छा

संरक्षण सचिवांनी सांगितलं की, याबाबत भारताचं धोरण असं आहे की, भारतात जे काही बनवलं जाऊ शकेल ते इथंच बनवलं जाईल. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हे जोरदार प्रयत्न आहेत. गुजरातच्या वडोदरा येथील प्लांटचं उद्घाटन ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com