तृणमूलमध्ये मोठे फेरबदल; अभिषेक बॅनर्जींची वाढली जबाबदारी

अभिषेक बॅनर्जी हे खासदार असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत.
Abhishek Banerjee
Abhishek Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinmool Congress) पक्षांतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना तृणमूल काँग्रेसचं सरचिटणीसपद सोपवण्यात आलं आहे. अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुतणे आहेत. तसेच अभिनेत्री सयोनी घोष यांना तृणमूल युवा काँग्रेस अध्यक्षपद देण्यात आलं आहे. दिग्गज नेते कुणाल घोष यांना पक्षाचा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलं आहे. (Major changes in Trinamool; Increased responsibility of Abhishek Banerjee)

विधानसभा निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींची होती महत्वाची भूमिका

ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत खूपच मेहनत घेतली होती. आपल्या भाषणाच्या माध्यमातून ते तरुणांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले होते. तसेच ममता बॅनर्जी या देखील अभिषेक यांच्या कामावर खूष होत्या. त्यामुळेच अभिषेक बॅनर्जी यांना बढती देत पक्षाचं सरचिटणीस बनवण्यात आलं आहे.

या नेत्यांना मिळाली महत्वाची पदं

दरम्यान, खासदार काकोली घोष दस्तीदार यांना तृणमूलच्या महिला मोर्चाच्या अध्यपदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर खासदार डोला सेन यांच्याकडे इंडियन नॅशनल तृणमूल ट्रेड युनियन काँग्रेसच्या (INTTUC) राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते पुर्नेंदू बोस यांची तृणूलच्या शेतकरी विंगच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पहिल्यांदाच आमदार बनलेले चित्रपट दिग्दर्शक राज चक्रवर्ती यांच्यावर सांस्कृतीक सेलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com