CBI Action : रुग्णांनाच मागितली लाच, RML हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांसह 9 जणांना अटक

CBI Action
CBI Action esakal

नवी दिल्लीः दिल्लीतल्या RML हॉस्पिटलमधल्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. येथे सीबीआयने मोठी कारवाई करत दोन डॉक्टरांसह ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. रुग्णांकडून लाच घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये मेडिकल उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.

सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये एक प्रोफेसर आणि एक असिस्टंट प्रोफेसर आहे. गरीबांवर उपचार करण्याच्या नावाखाली पैसे घेण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासह मेडिकल उपकरणांचा पुरवठा करण्याच्या नावाखाली डिलर्सकडून मोठी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने डॉक्टर्स आणि डिलर्सशी संबंधीत १५ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. सीबीआयने एफआयआरमध्ये १६ आरोपींचा उल्लेख केला आहे.

CBI Action
जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

आरएमएल रुग्णालयाचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पर्वतगौडा यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतलाना रंगेहात पकडण्यात आलेलं आहे. ही रक्कम त्यांनी युपीआयच्या माध्यमातून स्वीकारली होती. त्याशिवाय रुग्णालयातील कॅथ लॅबचे सीनियर टेक्निकल इंचार्ज रजनीश कुमार यांनाही अटक करण्यात आलेली आहे.

CBI Action
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

कार्डियोलॉजी विभागातील डॉक्टर अजय राज, नर्स शालू शर्मा, क्लार्क भूवल जैस्वाल आणि संजय कुमार गुप्ता यांच्यासह पाच इतर लोकांना अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्यांवर सीबाआयने प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अँड क्रिमिनल कॉन्सपिरेसी १२० बी नुसार अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com