
'प्रिय मोदीजी', 12 विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र; मांडले 8 मुद्दे
नवी दिल्ली- देशात कोरोनाचा (corona) हाहाकार माजला आहे. दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे, अशात देशातील १२ प्रमुख पक्षांनी (Major Opposition Parties) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांना पत्र लिहून काही मागण्या आणि सूचना केल्या आहेत. कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी तत्काळ काही पाऊलं उचलण्यास पक्षांनी सांगितलंय. कोरोना संकटाचा 'अभूतपूर्व मानवी आपत्ती' म्हणून उल्लेख करत विरोधी पक्षांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. केंद्र सरकारने याआधीच पाऊलं उचलली असती, तर ही वेळ आली नसती, असं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावर बसपा प्रमुख मायावती, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह बारा पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे. केंद्र सरकारला विरोधकांनी ८ सूचना केल्या आहेत. (Major Opposition Parties Send Joint Letter With 8 Points)
हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले : सोनिया गांधी
- केंद्र सरकारने उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक सोर्सकडून लस खरेदी करावी- स्थानिक किंवा जागतिक
- तत्काळ मोफत आणि सर्वांसाठी लसीकरण मोहीम राबवावी
-स्थानिक लसीकरण उत्पादन वाढवण्यासाठी कम्पलसरी लायसेन्स असावे
-लसीकरणासाठी केंद्र सरकारने ३५ हजार कोटींचा बजेट द्यावा
-सेंट्रल विस्टाचे बांधकाम तत्काळ थांबवावे आणि या पैशांचा वापर ऑक्सिजन-लशीसाठी करावा
- पीएम केअर्स फंड आणि इतर ट्रस्टमध्ये असलेला पैसा लस, औषधं आणि मेडिकल उपकरणे खरेदी करण्यासाठी करावा
-बेरोजगारांना महिन्याला ६ हजार रुपये द्यावे
- कृषी कायदे मागे घ्या, आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये कोरोना पसरत आहे
Web Title: Major Opposition Parties Send Joint Letter With 8 Points Pm Narendra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..