

NTA Leadership Changes Centre Appoints 3 Officers to Strengthen Exam Agency
ESakal
केंद्र सरकारने राष्ट्रीय चाचणी संस्थेमध्ये एका आयपीएस अधिकाऱ्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नीट पेपरफुटी आणि इतर संबंधित मुद्द्यांवरून एनटीए टीकेला सामोरे जात असतानाच या नियुक्त्या झाल्या आहेत. या अधिकाऱ्यांची संचालक आणि सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने २७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या स्वतंत्र आदेशानुसार, रवी कुमार सिंह (आयपीएस) आणि प्रसन्न वेंकटेश व्ही (आयएएस) यांची एनटीए मध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.