स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिला खास कानमंत्र

PM MODI,  Make In India To Make For World
PM MODI, Make In India To Make For World

74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजावंदन झालं. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये मोदींनी पुन्हा एकदा 'आत्मनिर्भर भारत' चा नारा दिला. तसेच आज नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे. आता प्रत्येक भारतीयाने आत्मनिर्भर बनने अनिवार्य असून, कोरोनाकाळात आत्मनिर्भर भारत हा देशासाठी कानमंत्र असल्याचे  मोदींनी भाषणात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले, जरी कोरोनानं देशासह जगाला ग्रासले असतानाही याकाळात भारतात मोठी परकीय गुंतवणूक झाली आहे. जगातील कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत.  त्यासाठीच मेक इन इंडिया( Make in India)सोबत भारत मेक फॉर वर्ल्ड (Make for World)साठी भारत काम करेल. जितकी आव्हाने आपल्यासमोर येतील त्या सर्वांचं आपण संधीत रुपांतर केलं पाहीजे. आपण बऱ्याच क्षेत्रात आत्मनिर्भर होत असून सध्या शेती क्षेत्रात आपण आत्मनिर्भर आणि स्वयंपुर्ण झालो आहोत. देशातील तरुणांवर विश्वास असून लवकरच आपण तंत्रज्ञानासह इतरही क्षेत्रात स्वयंपुर्ण  होऊ, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला. 

कोरोनावर आपण लवकरच मात करु असेही मोदी यावेळी म्हणाले. या संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकारकडून  शक्य तेवढी मदत पुरवली जाईल, असे आश्वासनही मोदींनी दिले. सध्या भारतात 3 लसींवर काम चालू आहे. त्या लसी सध्या चाचणीच्या विविध टप्प्यात आहेत. कोरोनावरील लस लवकरच बाजारात येईल, तसेच ती लस सर्व भारतीयांपर्यंत पोहचवली जाईल, असं मोदींनी सांगितलं.  भाषणामध्ये मोदींनी लडाखमधील चीनसोबत झालेल्या वादाचाही उल्लेख केला. लडाखमध्ये जे झाले ते जगानं पाहीलं. यावेळी त्यांनी भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर दिल्याचा उल्लेखही केला. यंदा मोदींनी सलग सातव्यांदा स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजावंदन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com