

Maldives Airport
sakal
माले : भारत सरकारने वित्तपुरवठा केलेल्या मालदीवच्या हनिमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मालदीवचे अध्यक्ष महंमद मोईझ्झू यांनी उद्घाटन केले. ‘‘हे विमानतळ देशाच्या उत्तर भागासाठी समृद्धीचे प्रवेशद्वार ठरेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षांच्या कार्यालयाच्या निवेदनानुसार, रविवारी विमानतळाचे उद्घाटन मोईझ्झू यांच्या हस्ते झाले.