
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अभिनव भारत संघटनेचा पैसा दहशतवादी कारवाईसाठी वापरल्याचा कोणताही पुरावा नाही. युएपीए या प्रकरणी लागू केला जाणार नाही असंही न्यायालयाने निकालात म्हटलंय. स्फोटातील बाईकचा चेसिस नंबर स्पष्ट नव्हता. स्फोटानंतर ती बाईक साध्वी प्रज्ञा यांच्याच मालकीची होती हे सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत असं न्यायालयाने निकालावेळी म्हटलं.