मालेगाव बॉम्बस्फोट; कर्नल पुरोहित यांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

Malegaon Blast Case Supreme Court Refuses To Entertain The Petition Of Colonel Purohit
Malegaon Blast Case Supreme Court Refuses To Entertain The Petition Of Colonel Purohit

मुंबई : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 'यूएपीए'अंतर्गत आरोपनिश्चित करण्याबाबत 'एनआयए'ने निर्णय घ्यावा, असे मत न्यायालयाने नोंदविले.

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, याबाबतची याचिकेवरील सुनावणीस नकार दिला. न्यायालयाने सांगितले, की ज्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे, त्याच न्यायालयात याचा अर्ज दाखल करावा. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर पुरोहित यांनी कनिष्ठ न्यायालयाने जे आरोप केले होते, ते थांबविण्याची मागणी केली होती. 

त्यानंतर आता कर्नल पुरोहित यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com