
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता एनआयए विशेष न्यायालयाने केलीय. यामुळे पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित हे चर्चेत आले आहेत. लष्कराच्या गुप्तचर विभागात कार्यरत राहिलेल्या कर्नल पुरोहित यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटात हात असल्याचा आरोप होता. जवळपास ९ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन दिला होता. एनआयए विशेष न्यायालयाने मालेगाव स्फोटात कर्नल पुरोहित यांच्याविरोधात कोणताच पुरावा आढळला नसल्याचं म्हटलं. युएपीए लावणंही योग्य नव्हतं असं निरीक्षण न्यायालायने नोंदवलंय.