
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान कॉंग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या सरकारमध्ये हे लोक सुटणारच होते.आम्हाला हे आधीच जाणवले होते, आता पुढे काय होते? ते पाहूया असं त्या म्हणाल्या . एवढेच नाही तर, रेणुका चौधरी काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्द वापरल्याबद्दल माफी मागण्यासही नकार दिला आहे. असे म्हणणे काही वाईट नाही असं रेणुका चौधरी म्हणाल्या.