सरकार लोकशाहीला नख लावणारे; मल्लिकार्जुन खर्गे

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 17 February 2021

राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विरोधी पक्षनेते या नात्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नव्या कारकिर्दीला आजपासून सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या नव्या जबाबदारीविषयी ‘सकाळ’शी बोलताना खर्गे यांनी मोदी सरकारचे वर्तन हे लोकशाहीच्या अस्तित्वालाच नख लावणारे असून याविरोधात राजकीय पक्षांनीच नव्हे तर, जनता आणि प्रसारमाध्यमांनीही भूमिका घेणे गरजेचे असेल, अशी भूमिका मांडली.

नवी दिल्ली - राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विरोधी पक्षनेते या नात्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नव्या कारकिर्दीला आजपासून सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या नव्या जबाबदारीविषयी ‘सकाळ’शी बोलताना खर्गे यांनी मोदी सरकारचे वर्तन हे लोकशाहीच्या अस्तित्वालाच नख लावणारे असून याविरोधात राजकीय पक्षांनीच नव्हे तर, जनता आणि प्रसारमाध्यमांनीही भूमिका घेणे गरजेचे असेल, अशी भूमिका मांडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील ४९ वर्षांपासून कर्नाटक विधिमंडळाच्या आणि संसदीय राजकारणात सक्रीय असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्रात काँग्रेस प्रभारी या नात्याने महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्येही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तर, मागील लोकसभेमध्ये काँग्रेसचे गटनेते राहिलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका करणाची आक्रमक परंतु नर्मविनोदी शैली उल्लेखनीय होती. गंभीर चर्चेचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या वरिष्ठ सभागृहातत्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा कस लागणार आहे.

किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवलं

आझाद यांचे राज्यसभेतील खासदारकीची मुदत काल (ता. १५) संपल्यानंतर आजपासून औपचारिकरित्या मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते झाले. काँग्रेसचे राज्यसभेतील घटलेले संख्याबळ आणि नेतृत्वाविरोधातील ज्येष्ठांच्या नाराजीमुळे उफाळलेले संघटनात्मक मतभेद या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आक्रमकता राज्यसभेमध्ये प्रभावीपणे मांडण्याचे आव्हान खर्गेंपुढे असेल. सध्या काँग्रेसचे फक्त ३६ खासदार राज्यसभेत असून सत्ताधारी भाजपचे या सभागृहातही बहुमत झाले आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा ते टूलकिट प्रकरणी चॅट व्हायरल; वाचा एका क्लिकवर

वादकांची भूमिकाही महत्त्वाची
सरकारला कोंडीत पकडण्यासाठी डावे पक्ष वगळता काँग्रेसला इतर विरोधी पक्षांची फारशी साथ मिळत नाही, असे काँग्रेसमधून सातत्याने बोलले जाते. त्यावर मल्लिकार्जून खर्गे यांनी, गाणे चांगले होण्यासाठी गायकासोबतच वादकांचीही भूमिका महत्त्वाची असते, असे सूचक विधान केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mallikarjun Kharge who is working hard for democracy politics congress