मल्ल्याच्या हस्तांतरासाठी ब्रिटनकडे विनंती

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

नवी दिल्ली: कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याचे हस्तांतर करण्याची लेखी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनला केली असल्याची माहिती ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. मल्ल्याविरोधात भारतीय स्टेट बॅंकेच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने एकत्रित याचिका केली असून, आज न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर त्याची सुनावणी झाली.

मल्ल्याने या सर्व बॅंकांकडून एकूण नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, ते फेडलेले नाही. केंद्र सरकारने मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्याने प्रामाणिकपणे आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे काय, असे प्रश्‍न न्यायाधीशांनी सरकारला विचारले. तसेच, न्यायालयाच्या परवानगीशिवाय आपली संपत्ती कुटुंबीयांच्या नावे न करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मल्ल्याने पालन केले आहे काय, अशीही विचारणा या वेळी करण्यात आली होती.

Web Title: Mallya's request to transfer britain