esakal | भारतात धर्मनिरपेक्षता आहे का? ख्रिसमसच्या सुट्टीवरून ममतांचा मोदी सरकारला सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banarjee

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आतापासूनच लढाई जुंपली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसात सतत पश्चिम बंगाल दौरा केल्यानं हे वातावरण आणखीन तापलं आहे.

भारतात धर्मनिरपेक्षता आहे का? ख्रिसमसच्या सुट्टीवरून ममतांचा मोदी सरकारला सवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ममता बॅनर्जी यांनी एका रॅलीमध्ये ख्रिसमसच्या सुट्टीवरून भाजप सरकारवर टीका केली. ख्रिसमसला राष्ट्रीय सुट्टी सुट्टी नसल्यानं मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. 

ख्रिसमस कार्निवलचं कोलकाता इथं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी प्रश्न केला की, येशु ख्रिस्ताच्या जन्मदिनावर राष्ट्रीय सुट्टी का नसते? ख्रिश्चन समुदायाने असं काय केलं आहे? भारतात धर्मनिरपेक्षता आहे का? मला हे सांगताना दु:ख होतंय की, भारतात धार्मिक द्वेषाचं राजकारण चाललं असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आतापासूनच लढाई जुंपली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसात सतत पश्चिम बंगाल दौरा केल्यानं हे वातावरण आणखीन तापलं आहे. नुकतंच अमित शहा यांनी बंगाल दौरा केला. यावेळी ममतांचे निकटवर्तीय असलेल्या सुभेंदु अधिकारी यांच्यासह तृणमूलमधील 8 नेते भाजपमध्ये गेले. 

हे वाचा - देशातील मुस्लिम मुलींना 'स्वच्छ भारत मोहिमे'नं मोठा दिलासा मिळाला :PM मोदी

बोलपूर इथं अमित शहा यांनी राज्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता. पश्चिम बंगाल अनेक बाबतीत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेला आहे आणि भ्रष्टाचार, खंडणी यात पुढे असल्याचा आऱोप शहा यांनी केला होता. यावर ममता बॅनर्जी यांनी उत्तर देताना सांगितलं की, शहा जे म्हणाले ते सर्व आम्ही पुराव्यानिशी खोटं असल्याचं सिद्ध करू शकतो.