ममता बॅनर्जी स्कूटरवरून पोहोचल्या मुख्यमंत्री कार्यालयात

petrol diesel hike
petrol diesel hike

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध केला आहे. ममता बॅनर्जींनी गुरुवारी कारने प्रवास न करता स्कूटरवरून मुख्यमंत्री कार्यालय गाठलं. मंत्री फिरहाद हकीम हे स्कूटर चालवत होते तर ममतादीदी मागच्या सीटवर बसल्या होत्या. अर्थात ही स्कूटरही त्यांनी ग्रीन निवडली होती. तोंडाला मास्क, डोक्याला हेल्मेट घालून गाडीवर बसलेल्या ममता बॅनर्जी यांनी एक पट्टाही अडकवला होता. त्यावर इंग्रजी मजकुरातून केंद्र सरकारचा निषेध केला. 

ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, तुमच्या बोलण्यात काय आहे? फक्त पेट्रोलच्या किंमती वाढवण, डिझेलच्या किंमती वाढवण आणि गॅसच्या किंमती वाढवणं. ममता बॅनर्जींच्या या इलेक्ट्रिक स्कूटर प्रवासाचे लाइव्ह प्रसारण करण्यात आले. त्यांनी वाढत्या इंधन दरांचा विरोध करण्यासाठी ही भन्नाट शक्कल लढवली. पश्चिम बंगालमध्ये या महिन्यात पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयांच्या वर पोहोचले आहे. 

याआधी शेतकऱी आंदोलनाला पाठिंबा देताना बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी असंच वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं होतं. त्यांनी ट्रॅक्टर चालवत विधानसभा गाठली होती. ट्रॅक्टरवर सोबत काही लोकही होते. यावेळी तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं की, सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही. सरकारची हुकूमशाही चालली आहे असाही आरोप त्यांनी केला होता. 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. तर ममता बॅनर्जी यांनी महागाई, पेट्रोल आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला घेतलं आहे. बंगालमध्ये भाजपने सोनार बांगला मोहिम सुरू केलीय. या मोहिमेतून भाजप बंगालमधील लोकांकडून सूचना मागवत आहे. जवळपास 2 कोटी सूचना मागवण्यात येत असून बंगालमध्ये 30 हजार सूचना पेट्या लावण्यात आल्या आहेत. 3 ते 20 मार्च या कालावधीत ही मोहिम राबवली जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com