LokSabha 2019 : मोदी, हिंमत असेल तर पश्चिम बंगालमधून लढाः ममता

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

मला माहीत आहे की, मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी. मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल.

कोलकताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक पश्चिम बंगामधून लढवून दाखवावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

ममता म्हणाल्या, 'मला माहीत आहे की, मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी. मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल. त्यांनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्वावेच लागेल. पश्चिम बंगालमधून त्यांनी निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. जर त्यांना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच 42 जागांवरुन निवडणूक लढवावी.'

'कोणीही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मोदी जर पश्चिम बंगालमधून निवडणूक लढले तर मी पण वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. पश्चिम बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी येथून निवडणूक लढवावी. त्यांनी येताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनेलाही येथे आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा. जनता त्यांना निरोप देईन,' असा टोलाही ममता यांनी लगावला.

Web Title: mamata banerjee challenges pm narendra modi to fight elections from west bengal lok sabha election 2019