निवडणुकीत दोन माजी आमदारांचा 'करेक्ट कार्यक्रम'; काँग्रेसचं वर्चस्व वाढलं I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना धूळ चारलीय.

निवडणुकीत दोन माजी आमदारांचा 'करेक्ट कार्यक्रम'; काँग्रेसचं वर्चस्व वाढलं

KDCC Bank Election : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा बॅंकेचा (Kolhapur District Bank Election) निकाल नुकताच जाहीर झालाय. यात अपेक्षेप्रमाणं सत्ताधाऱ्यानीच आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केलंय. बँकेसाठी करवीर तालुक्यातून (Karveer Taluka) इतर मागास मधून शिवसेनेला व शेकापला इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद प्रतिनिधी गटातून संधी देण्यात आली. मात्र, या दोन्ही उमेदवारांना पराभवला समोरे जावं लागलंय. भैय्या माने (Bhaiya Mane) यांनी क्रांतीसिंह पाटील यांचा तर, विजयसिंह माने (Vijaysingh Mane) यांनी रवींद्र मडके यांना पराभवाची धूळ चारलीय. या निकालानंतर करवीरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचं (Congress) वर्चस्व वाढल्याचं दिसून आलंय. त्यामुळं आगामी निवडणुकीत याचा फायदा पक्षाला होणार आहे.

हेही वाचा: कसला भारी योगायोग! राज्यमंत्र्यांच्या गाडीचा नंबर 98 अन् मतंही 98

अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर बॅंक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना धूळ चारलीय. शेकापचे माजी आमदार संपत पवार पाटील यांचे सुपुत्र क्रांतीसिंह पवार पाटील तर करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडके यांना विरोधी गटातून संधी देण्यात आली. हे दोन्ही उमेदवार राजकीय ताकद असणारे असल्याने शिवसेना (Shiv Sena), शेकापकडून विजयासाठी मोठे प्रयत्न झाले; पण विजयसिंह माने यांनी रवींद्र मडके यांचा १८८१ मतांनी तर भैय्या माने यांनी क्रांतीसिंह पाटील यांचा ६१० असा मोठ्या फरकाने पराभव केल्याने सेना, शेकापचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा सुरू झालीय.

Kolhapur District Bank Election

Kolhapur District Bank Election

हेही वाचा: विरोधी गटातून निवडून आलेले 'हे' दोन संचालक सेनेच्या गळाला?

पी. एन. पाटील यांची जिल्हा बँकेला बिनविरोध निवड झाल्याने काँग्रेसचे पारंपारिक विरोधक शिवसेना व शेकापच्या गोटात राजकीय निराशा निर्माण झाली होती. पण, जागा वाटपातून मतभेद झाले आणि अचानक संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी शिवसेना स्वबळावर विरोधी पॅनेल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचा म्हणावा तसा फायदा शिवसेना पॅनेलला घेता आली नाही आणि या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top