पाकविरोधी काहीही ऐकण्यास ममतांचा नकार: फतेह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाकिस्तानविरूद्ध काहीही ऐकून घेण्यास तयार नसल्याची टीका लेखक आणि पाकिस्तानसंदर्भातील घडामोडींचे अभ्यासक तारेक फतेह यांनी केली आहे.

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाकिस्तानविरूद्ध काहीही ऐकून घेण्यास तयार नसल्याची टीका लेखक आणि पाकिस्तानसंदर्भातील घडामोडींचे अभ्यासक तारेक फतेह यांनी केली आहे.

'बलुचिस्तान आणि पाकिस्तानपासूनचे त्याचे स्वातंत्र्य' या विषयावर फतेह यांचा पश्‍चि बंगालमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोलकाता येथील कोलकाता क्‍लब येथे फतेह यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमामुळे जातीय दंगली घडू शकतात असे म्हणत आयोजकांनी फतेह यांना हा कार्यक्रम रद्द झाल्याचे कळविले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'कोलकाता क्‍लबवर पोलिसांनी दबाव टाकल्याचे पाहून मला आश्‍चर्य वाटते. अर्थातच पश्‍चिम बंगालमधील मुस्लिमांना डिवचल्यासारखे वाटेल बसेल, म्हणून ममता बॅनर्जी सरकारने पोलिसांना सूचना दिल्या आहेत'

पाकिस्तान बलुचिस्तानवर गेल्या 70 वर्षांपासून अत्याचार करत असून त्यामध्ये हजारो नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे पश्‍चिम बंगाल सरकारच्या या कारवाईमुळे आश्‍चर्य वाटले. 'एखाद्या मूर्खाने हा निर्णय घेतला असता तर ते समजू शकलो असतो. मात्र, ममता बॅनर्जी सरकारने जाणीवपूर्वक असा निर्णय घेतला आहे. त्यांना पश्‍चिम बंगालमधील मुस्लिम हे पाकिस्तानचे समर्थन वाटणे धोकादायक आहे', असेही फतेह पुढे म्हणाले.

Web Title: Mamata Banerjee government cancels Tarek Fatah’s Balochistan talk in West Bengal