esakal | Lakhimpur: ममता दीदी भाजपवर संतापल्या; "हे राम राज्य की,...?"
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur
ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

लखीमपूर प्रकरणी ममता दीदी संतापल्या; "हे राम राज्य की,...?"

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात चार शेतकऱ्यांसह आठ लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले असून, मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद उमटता आहेत. देशभरातील सर्व विरोधीपक्ष नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत टीका केली. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

लखीमपूरमध्ये काल झालेल्या घटनेत केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आणि त्यात चार शेतकरी मारले गेल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आला होता. त्यावर आता ममता बॅनर्जी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. लखीमपूरमध्ये घडलेली घटना निंदणीय आहे. या घटनेनंतर आपण निशब्द झालो आहोत. भाजपला लोकशाहीवर विश्वास नसून, त्यांना हुकूशाहीवर विश्वास आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे राम राज्य आहे की, खूनी राज्य असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Lakhimpur Violence : शेतकऱ्यांच्या मृत्यूवर PM मोदी गप्प का? - कन्हैया

दरम्यान, लखीमपूरमध्ये मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. तसंच मृताच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल. य़ाशिवाय जखमी शेतकऱ्यांना दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

loading image
go to top