Mamata Banerjee and narendra modi
Mamata Banerjee and narendra modie sakal

मी काय त्यांची नोकर आहे का? नेताजी पुतळा अनावरण निमंत्रण पद्धतीवरून ममता भडकल्या

Published on

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर संताप व्यक्त काल. दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी ममता यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र आपण या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे ममता यांनी स्पष्ट केलं.

Mamata Banerjee and narendra modi
Love Jihad चे सावट! नवरात्र उत्सवातील गरब्यात आता ओळखपत्राशिवाय ‘नो एंट्री’

कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे कारण ममता यांनी सांगितले. ममता म्हणाल्या की, कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्याची पद्धत योग्य नव्हती. बुधवारी एका अवर सचिवांकडून आमंत्रणाचे पत्र मिळाले होते. ज्यामध्ये आज संध्याकाळच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती.

ममता यांनी कोलकाता येथील एका सभेत सांगितले की, मला बुधवारी अवर सचिवांकडून एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता नेताजींच्या पुतळ्याचे उद्घाटन होईल आणि तुम्ही संध्याकाळी ६ वाजता तेथे हजरा रहा, असं म्हटलं होतं. हे पत्र अशा व्यक्तीने दिलं, जणू मी त्याची सेवक आहे. अवर सचिव मुख्यमंत्र्यांना कसे पत्र लिहू शकतात? सांस्कृतीक मंत्री एवढे मोठे कसे होतात?, असा सवालही ममता यांनी उपस्थित केला.

Mamata Banerjee and narendra modi
रणनितीकार प्रशांत किशोर यांना लागले भाजपचे वेध; बड्या नेत्याचा दावा

ममता ऐवढ्यावरच थांबल्या नसून त्यांनी दुपारी कोलकाता येथे नेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी इंडिया गेटजवळ नेताजींच्या पुतळ्याचे आणि सेंट्रल व्हिस्टाचे उद्घाटन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com