ममतांच्या RSS वरील विधानावरून राजकीय भूकंप; काँग्रेस, एमआयएमने दिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata  Banerjee

ममतांच्या RSS वरील विधानावरून राजकीय भूकंप; काँग्रेस, एमआयएमने दिली प्रतिक्रिया

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल (RSS) केलेल्या विधानामुळे राजकीय वादळ आले आहे. यावर आता एआयएमआयएम, काँग्रेस आणि भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. तर या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (Mamata Banerjee news in Marathi)

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

ममता म्हणाल्या की, आरएसएसमधील सर्वच लोक वाईट नसतात, त्यात बरेच लोक आहेत, जे भाजपला पाठिंबा देत नाहीत. या विधानाबाबत एआयएमआयएम, काँग्रेस आणि सीपीआय(एम) यांनी ममता यांच्यावर निशाणा साधला आहे. ममताचा हा संधीसाधूपणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपने आरएसएसला ममता यांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान ममता यांनी केलेल्या स्तुतीवर भाष्य करण्याऐवजी आरएसएसने बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या घटनांकडे लक्ष वेधले. तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

ममताच्या विधानावर सर्वात खोचक टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली. त्यांनी म्हटलं की "2003 मध्येही ममता यांनी आरएसएसला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर RSS ने प्रत्युत्तरात ममता यांना दुर्गा म्हटले होते. तथापि, टीएमसीने ओवेसींच्या प्रतिक्रियेला फारसे महत्त्व दिले नाही. तसेच ओवेसी यांच्यासमोर आम्हाला धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्याची आवश्यकता नसल्याचं नमूद केलं.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या टीकेला अनुसरून टीका केली. तसेच ममता या अटल बिहारी वाजपेयी यांच्या एनडीएचा भाग होत्या, असंही म्हटलं. तर डाव्यांनी म्हटलं की, ममता यांच्या विधानाने हे स्पष्ट होतं की, त्या आरएसएसमधूनच आल्या आहेत.

Web Title: Mamata Banerjee Rss Congress Cpm And Aimim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..