
Mamata Banerjee sparks controversy over late night women safety remark in Bengal
Esakal
पश्चिम बंगालमध्ये आणखी एका एमबीबीएस विद्यार्थीनीवर सामुहिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तिघांना अटकही करण्यात आलीय. दरम्यान, बलात्काराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केलंय. मुलींना रात्री बाहेर जाऊ दिलं नाही पाहिजे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातल्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय.