'दोन हजारच्या नोटेवर बंगालचा टायगर का नाही?'

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे व हजारच्या नोटेवर घातलेल्या बंदीवर सर्वच विरोधी पक्ष एकजूट होताना दिसत असून, दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंगालच्या टायगरचे छायाचित्र का नाही छापले, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

बॅनर्जी म्हणाल्या, 'प्रत्येकाला सुंदरवन व बंगालच्या वाघाबद्दल माहित आहे. पंरतु, दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंगालचा टायगर दिसत नाही. या नोटेवर हात्ती दिसत आहे. परंतु, बंगालचा टायगर नाही. राष्ट्रीय प्राण्यांना मोदी सरकार पद्धतशीरपणे विसले आहे. त्यांना याच्याशी काही देणे-घेणे नाही.'

पंतप्रधानांना जे वाटेल तेच ते करत आहेत. हात्ती राष्ट्रीय वारसा आहे, असे मोदी म्हणत असतील तर ठिक आहे. आम्हाला काही अडचण नाही. परंतु, बंगलचा टायगर का नाही? बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी 1000, 500च्या नोटांवर कोणत्याही प्राण्याचे छायाचित्र नव्हते. शिवाय, 100, 50 व 20 रुपयांच्या नोटेवरी नाही. फक्त 10 रुपयांच्या नोटेवर वाघ, हात्ता व गेंड्याचे छायाचित्र आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

Web Title: mamta banerjee ask questions new note of rs 2000